चालक दिनाचे औचित्य साधून नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन
राजेंद्र फड
चालकदिनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ सोहळा
नाशिक, दि.१४ सप्टेंबर:- चालक दिनाचे औचित्य साधत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता स्वामीनारायण हॉल, नवीन आडगाव नाका येथे चालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व अपघात विमा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष पी.एम.सैनी यांनी दिली आहे.
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस व विश्वकर्मा जयंती १७ सप्टेंबर रोजी चालक दिन साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही चालकांच्या हिताच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालक दिनाचे औचित्य साधत चालकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर तसेच एक लाखाचा अपघाती विमा चालकांना वितरित करण्यात येणार आहे. तसेच चालकांना वाहतूक नियम व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात अतिशय उत्कृष्ट सेवा बजावलेल्या चालकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस दिल्लीचे अध्यक्ष अमृतलाल मदान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सिमटाचे जनरल सेक्रेटरी जी.आर.संघाप्पा, उपाध्यक्ष सुरेश खोसला, माजी अध्यक्ष मलकितसिंह बल, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक प्रकाश गवळी, नॉर्थ झोन उपाध्यक्ष जयपाल सिंग, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक विजय कालरा, प्रवासी बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, ट्राफिक पार्कचे चेअरमन अभय कुलकर्णी, नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष किशोर माने, मासिआचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, ए.आय.एम.टी.सी.चे संचालक बाळासाहेब कलशेट्टी, प्रमोद भावसार यांच्यासह नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

