[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

म.वि. प्र. मध्ये विकासाला सर्वोत्तम प्राधान्य देणार.- . ॲड. श्री.नितीन ठाकरे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

म.वि. प्र. मध्ये विकासाला सर्वोत्तम प्राधान्य देणार.- . ॲड. श्री.नितीन ठाकरे

उसवाड (ता.चांदवड) मराठा विद्या प्रसारक समाजाचे नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळ यांचा उसवाड तालुका चांदवड येथे समस्त ग्रामस्थ व येथील डॉ.ना.का.गायकवाड विद्यालय परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी सर्वप्रथम विद्यालयातील गितमंचकडून इशस्तवन व स्वागतगीत गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री देवचंद एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले तर प्रास्ताविक उपशिक्षक श्री एस टी पवार यांनी केले.


राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची अग्रगण्य व जिल्हाभर विस्तार असलेल्या नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस ऍड नितीन बाबुराव ठाकरे यांचा सत्कार श्री.अशोकदादा गायकवाड व श्री देवमन म्हातारजी पवार, सभापती मा.श्री.बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर यांचा सत्कार श्री संजय जगन्नाथ पवार व श्री केदु श्रावण बच्छाव, चांदवड तालुका संचालक मा श्री डॉ सयाजीराव गायकवाड यांचा सत्कार श्री निवृत्ती नामदेव गायकवाड व श्री अशोक सवांद्रे तर देवळा तालुका संचालक मा श्री विजय पोपट पगार यांचा सत्कार दादा बिडगर व देवाजी गायकवाड, येवला तालुका संचालक मा श्री नंदकुमार बालाजी बनकर यांचा सत्कार प्रमोद शिंदे व अप्पा शिंदे तसेच सेवक संचालक मा श्री जगन्नाथ निंबाळकर यांचा सत्कार समाधान गायकवाड व प्रशांत बिडगर यांनी आदी मान्यवरांचा सत्कार केला. याच वेळी डॉ सयाजीराव गायकवाड यांच्या मातोश्री सिताबाई नारायण गायकवाड यांचा देखील सत्कार संस्थेचे सरचिटणीस मा. ऍड नितिन बाबुराव ठाकरे यांनी केला.
या वेळी तालुक्यातील इतर संस्था,संघटना, संघ तसेच काहींनी वैयक्तीक स्वरूपात सत्कार केला.
मान्यवरांच्या मनोगतात संस्थेचे नवनिर्वाचित सभापती मा.श्री.बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर यांनी सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. भविष्यात संस्था अधिकाधिक प्रगतीपथावर कशी जाईल या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ काम करेल याची हमी या वेळी दिली.
तसेच संस्थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस मा.ऍड श्री नितीनजी ठाकरे यांनी म.वि प्र विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

कर्मचारी वर्गाने आपापले कामकाज प्रामाणिकपणे पार पाडावे. कोणत्याही प्रकारचे राजकारण शाळेत करू नये.

भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी सर्व म वि प्र सभासद व कार्यकर्ते यांचे आभार मानले.
तसेच उसवाड गावचे भूमिपुत्र तथा कर्तव्यदक्ष विद्यमान संचालक मा.डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी सर्व सभासदांचे आभार मानले व कर्मचारी वर्गाने

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक काळजीपूर्वक व कर्तव्यदक्ष पणे ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे हे सांगितले.

या नंतर अध्यक्षीय भाषण झाले. या वेळी विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री ए डी अहिरे सर,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातून आलेल्या अनेक शाळेच्या कर्मचारी वर्ग, सभासद, पालक, पंचक्रोशीतील कार्यकर्ते, हितचिंतक यांनी उपस्थित पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार केला.
या वेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी म वि प्र चे सभासद श्री अशोकदादा गायकवाड, संजय पवार, केदु बच्छाव,डॉ.चंद्रभान गायकवाड, वामन पवार,देवमन पवार,वामन गायकवाड, भिलू आहेर,दादा बिडगर,समाधान गायकवाड, प्रशांत बिडगर,प्रमोद शिंदे,आप्पा शिंदे, किशोर पवार, ज्ञानेश्वर शिंदे, बापू पवार, गौरव बटाव, देवाजी गायकवाड, भास्कर थोरमीसे , गोटीराम पवार, प्रवीण गांगुर्डे इत्यादींचे मोलाचे सहकार्य केले व डॉक्टर नाका गायकवाड माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कुंभार्डे सर यांनी केले तर आभार श्री सुर्यवंशी सर यांनी मानले .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या