[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे येथे ज्ञानेश्वरी जयंती साजरी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दि.16 सप्टेंबर रोजी शिंगवे नगरीत हनुमान मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती निमित्ताने सायंकाळी भजनी मंडळ व ग्रामस्त यांनी हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून ह.भ.प.संजय महाराज दुकळे यांचे हरी कीर्तन झाले त्यानी ज्ञानेश्वरी ह्या पवित्र ग्रंथाचे महत्व व आपल्या जीवनात स्थान कीर्तन रुपाने समजावून सांगितले प्रसंगी मनमाडचे गोविंद नागरी पतसंथेचे संचालक श्री नितीनभाऊ गवळी यांनी ज्ञानेश्वरी ह्या पवित्र ग्रंथाचे ज्याला पाहिजे त्यांना मोफत वाटप केले कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर सर्वानी भोजनाचा आस्वाद घेतला कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन हे ह.भ.प.अण्णा महाराज बोरसे यांनी केले होते

ह.भ.प.संजय महाराज दुकळे सर यांचा शाल व श्रीफळ देवून ह.भ.प.दिनकर खर्डे बाबा यांनी सत्कार केला तसेच श्री नितीन भाऊ गवळी यांचा सत्कार शिंगवे सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री संजय आहिरे यानी केला गावातील भजनी मंडळ ह.भ.प चिंधु बोरसे,ह.भ.प.दिपक पाटिल,ह.भ.प.बाळू महाराज झाल्टे,ह.भ.प.दिनकर बाबा,ह.भ.प.वाळूबा काळे,ह.भ.प.कैलास शिंदे,ह.भ.प.माळी सर,ह.भ.प.कारभारी बोरसे,श्री सुखदेव बोरसे,श्री संजय बोरसे,श्री अंबादास बोरसे,श्री जगदीश बोरसे,श्री बोराडे व ग्रामस्त उपस्थित होते

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या