[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा आवाज हरपला – माजी खासदार समीर भुजबळ

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा आवाज हरपला – माजी खासदार समीर भुजबळ

 केंद्रीय मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा आवाज हरपला अशा शब्दात माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील सुयश हॉस्पिटल येथे त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

शोक संदेशात माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, सलग नऊ वेळा लोकसभेत नंदुरबारचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क होता. आदिवासी बांधवांचे प्रश्न त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक केली. खासदार म्हणून काम करत असतांना लोकसभेत त्यांच्या समवेत काम करण्याची संधी देखील मला मिळाली होती. त्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी महत्वाची पद भूषविली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय गावित कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे समीर भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या