[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला श्री स्वामी समर्थ परिवार व नितीन मोरे यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवडला श्री स्वामी समर्थ परिवार व नितीन मोरे यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न….

चांदवड : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर यांच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन आयोजित संकल्प एक कोटी महावृक्षरोपण व वन संवर्धन अभियान अंतर्गत दि.१५.सप्टेंबर रोजी गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

पर्यावरण संतुलित, समृद्ध व्हावे यासाठी या परिवारामार्फत मोठ्या प्रमाणात म्हणजेच एक कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे. ज्यातील हवामान, जमीन, पाण्याचा अभ्यास करून कृषी हवामान विभागानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन होणे आवश्‍यक आहे. बऱ्याचदा लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रजाती, वनस्पतींची काहीवेळा निवड केली जाते. कुठल्या जागेवर कुठल्या झाडांची लागवड करावी, रोपे कशी करावी, रोपे बेणे उपलब्धता लागवडीसाठी खड्डे आकार, लागवडीची पद्धत याची माहिती असणे आवश्‍यक आहे. लागवडीनंतर पाणी, खते व्यवस्थापन, सावली, जनावरांपासून संरक्षणाचे नियोजन झाले, तर रोपवन किंवा लागवड केलेली झाडे चांगली वाढतील. त्यामुळे परिसर समृद्ध, संपन्न होण्यासाठी मदत होणार आहे. वृक्ष लागवडी वेळी बऱ्याचदा प्रदेशनिष्ठ नसलेल्या, आपल्या जंगलामध्ये न आढळणाऱ्या प्रजातींची लागवड केली जाते. पर्यावरण पूरक वनस्पतीची निवड न केल्याने अन्नसाखळ्या सुदृढ होण्याऐवजी त्यावर दुष्परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे. यासाठी पर्यावरण पूरक वनस्पतीची लागवड होणे आवश्‍यक आहे.

गावाच्या परिसरात सार्वजनिक जमिनी, गायराने, शाळा, महाविद्यालय परिसर, पाण्याचे पाट, नद्या, नाले, तलाव, रस्ते, शेताचे रस्ते, शेताचे बांध, शेतातील घरे, गावातील घरे इ. ठिकाणी वनस्पतीतील गुण, गुणधर्म, आकारमान इ.चा विचार करून लागवड करणे आवश्‍यक आहे.अशी माहिती गुरुपीठ पुत्र नितीन मोरे यांनी सांगितले.तसेच देवाने दिलेली ही नैसर्गिक देणगी आहे.तिचा वापर कसा करावा व जोपासना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी चांदवड तालुक्यात चांदवड, कांनमडाळे, गोहरण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी गुरुपीठ पुत्र नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम झाला असून, चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन च्या अध्यक्षा रिंकू कासलीवाल यांनी आपल्या संस्थे अंतर्गत रोपे पुरविली.

यावेळी कानमंडाळे येथील सरपंच, सविता शिंदे, ह.भ.प.कीर्तनकार संजय शिंदे ,चेअरमन मनोज किरकाडे, पोलीस, पाटील छाया जाधव माजी सरपंच माणिक पवार , बाजीराव चौधरी, मुख्याध्यापक धाकराव व ईतर शिक्षक तालुका, प्रतिनिधी हेमलता बैरागी, गोहरण येथील पवनकुमार जाधव,सरपंच वैशाली जाधव,बाळू जाधव,चांदवड येथे ,चांदवड तालुका प्रशासकीय प्रतिनिधी प्रमिला चव्हाण तालुका प्रतिनिधी शुभांगी मेतकर बालसंस्कार जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर , रोहीणी भुसारे चांदवड बालसंस्कार तालुका प्रतिनिधी मिना सलगिरे, कल्पना ठोंबरे, तात्यासाहेब पुरकर , सिडको विभाग मनिषा लोखंडे चांदवड केंद्र प्रतिनिधी गंगाधर सोणवने , मनिषा सोणवने , मनिषा बापू गांगुर्डे ,प्रियंका पाटील व ईतर सेवेकरी परीवार उपस्थित होता.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या