केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारतीताई पवार यांच्या हस्ते उसवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उसवाड येथे सौरदीपचे उद्घाटन…
चांदवड : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते आज चांदवड तालुक्यातील उसवाड येथे ISTPL या कंपनीने तालुक्यातील प्रा.आ. केंद्राला सि.एस.आर. फंड मधुन दिलेल्या सोलर सिस्टिीमचा प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण सोहळा उसवाड येथे संपन्न झाला.
यावेळी प्रथम आरोग्य केंद्र उसवाड येथे दैनंदिन रुग्णांसाठी लागणाऱ्या सेवांचा देखील आढावा घेण्यात आला.
तसेच येथे दिल्या जाणाऱ्या सेवा मध्ये २३ प्रकारचे रक्त चेक करणे आणि ६४ प्रकारचा औषध उपचार पुरवला जाणार अशी माहिती भारतीताई पवार यांनी दिली . आरोग्याच्या दिल्या जाणाऱ्या सर्व सेवाबदल माहिती देऊन व ग्रामस्थांना १०० टक्के सेवा मिळतील याबाबत सुचना केल्या.
सोलर सिस्टिममुळे प्रा.आ. केंद्रामध्ये विजेची बचत व आवश्यक वेळेला विज पुरवठा खंडीत झाल्यावर सोलर सिस्टिमचा उपयोग होणार आहे . याबाबत ISTPL कंपनीचे सि.ओ.कृष्णमोहन यांनी सांगितले .येथील सर्व भौतिक सुख सुविधा या पूर्णपणे राबविण्यात याव्यात तसेच कुणीही वारंवार गैरहजर राहणार नाही तसेच प्रथमोपचार मध्ये कुणी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
आणि ,कामात टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही केल्या जाईल व कोणाची हि गय केली जाणार नाही असे या उदघाटन प्रशंगी भारतीताई पवार यांनी येथील कर्मचारी यांना तबी देण्यात आली. व उद्या संदर्भात अधिक माहिती दिली.
यावेळी ISTPL कंपनीचे मुख्याधिकारी कृष्ण मोहन आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर आरोग्य अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे तहसीलदार प्रदीप पाटील भूषण कासलीवाल डॉक्टर आत्माराम कुंभार्डे मनोज शिंदे प्रशांत ठाकरे व आशा वर्कर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

