आज दिघवद, दहिवद, वाहेगावसाळ, काळखोड, तळेगाव रोही ता.चांदवड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शासकीय अधिकारी यांच्यासमवेत आ.डॉ.राहुल दादा आहेर यांनी पाहणी केली. तसेच तालुक्यातील सर्व नुकसान ग्रस्त शेतकर्यांचे तात्काळ पंचनामे करावे असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्री. मनोज शिंदे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ.गीताताई झालटे, श्री.गणेश महाले, श्री.अमर मापारी, श्री.पिंटू भोयटे, श्री.मिलिंद खरे, श्री.गणेश निंबाळकर, श्री.जगदीश कोल्हे, श्री.राजेश गांगुर्डे, श्री.पिंटू भोयटे, श्री.राजू पाटील, श्री.मारुती शेळके, श्री.केशव खरे, श्री.भूषण शेळके, श्री.वाल्मिक वानखेडे, श्री.दिगर वाघ आदीसह प्रांताधिकारी श्री.चंद्रशेखर देशमुख, गटविकास अधिकारी श्री.महेश पाटील तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


