[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यातील चाळीत साठवलेला कांदा पावसामुळे व आद्रतेच्या वातावरणामुळे खराब झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी – डॉ. आत्माराम कुंभार्डे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील चाळीत साठवलेला कांदा पावसामुळे व आद्रतेच्या वातावरणामुळे खराब झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी – डॉ. आत्माराम कुंभार्डे

चांदवड तालुका परिसरात अनेक दिवसापासून ढगफुटी सदृढ पाऊस चालू आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचा रब्बी चा उन्हाळा कांदा भाव नसल्यामुळे साठवून पाच ते सहा महिने झाले आहे तो कांदा या अति पावसामुळे व आद्रतेच्या वातावरणामुळे खराब झाला आहे तो अतिशय खराब म्हणजे इतका खराब झाला की त्यातून काळे पाणी बाहेर येऊन कांदा चाळी या साडेसहा फूट उंच भरलेल्या होत्या त्या आता अडीच ते तीन फुटापर्यंत खाली बसून फक्त त्यांच्यामध्ये दोन तीन फूट इतकेच कांदे शिल्लक कांदे शिल्लक राहिलेले आहे

गेल्या 3 महिन्यापासून पाऊस असल्यामुळे खराब झालेले कांदे चाळ फोडून कोरडे होण्यासाठी उन पडले नसल्यामुळे सुकविता पण आलेले नाही व मार्केट मध्ये पण कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे त कष्टाने पिकविलेल्या कांद्याकडे डोळ्यासमोर खराब झालेले बघण्यापलिकडे काहीही पर्याय राहिलेला नाही. तरी शासनाने त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या