[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अतिदुष्टीमुळे चांदवड तालुक्यात झालेल्या अतोनात नुकसानी बाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांना चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आलेले सरकार हे निष्काळजी आहे व वरील १ ते ५ मुद्यावर शासनास धारेवर धरुन संबंधित वरील विषय आमलात आणुन शेतकरी कष्टकरी यांना आपल्या पासून न्याय मिळेल व मिळावा या कारणास्तव आपलेस्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी.

अतिदुष्टीमुळे चांदवड तालुक्यात झालेल्या अतोनात नुकसानी बाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांना चांदवड तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

चांदवड तालुक्यात सततच्या अतिदृष्टीमुळे चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिंकाचे तसेच
मालमत्तेचे नुकसान झाले असुन त्या अनुशंगाने खालील मागण्या आपणास सादर करीत आहोत, संपूर्ण चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. व त्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या जमिनी ह्या पाण्यामुळे वाहुन गेलेल्या आहे. तसेच पिक देखील भुईसफाट झालेली आहे. तरी
संबंधित तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तालुक्यातील सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळावी. लम्पी आजाराच्या पार्श्वभुमीवर लसी वाढवून मोठ्या प्रमाणात जलदगतीने जनावरांचे लसीकरण व्हावे. पशुवैद्यकीय दवाखाण्यातील डॉक्टर्स तसेच सर्व कर्मचा-यांची प्रचंड कमतरता असून त्वरीत भरती करण्यात यावी,तालुक्यात जवळ जवळ ५०% पदे रिक्त असल्याने पशु धारकांची परवड होत आहे.चांदवड तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली असून संबंधित रस्ते तातडीने दुरुस्ती तसेच ज्या रस्त्याची डांबरी करणा संबंधित मंजुरी देण्यात आलेली असुन ते तात्काळ कामे सुरु करण्यात यावी याबाबत विनती.

ग्रामिण भागात वाडीवस्तीवर सिंगल फ्रेज योजना कार्यान्वीत करण्यात यावी सौर विद्युत पंप योजना इतर राज्यात चालू असून महाराष्ट्र राज्यात संबंधित योजना बंद आहे व शेतकरी संबंधित योजनेपासून वंचित असुन संबंधित योजना तात्काळ सुरु करण्यात यावी.
संबंधित आलेले सरकार हे निष्काळजी आहे व वरील १ ते ५ मुद्यावर शासनास धारेवर धरुन संबंधित वरील विषय आमलात आणुन शेतकरी कष्टकरी यांना आपल्या पासून न्याय मिळेल व मिळावा या कारणास्तव आपलेस्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी.
अशी मागणी विधानपरीषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब याच्याकडे चांदवड तालुका शिवसेनेच्यावतीने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर, तालुकाप्रमुख, विलास नाना भवर,
तालुका संघटक केशव ठाकरे, उपतालुकाप्रमुख, दत्तु शेळके, गटप्रमुख विक्रम वाघचौरे, गट संघटक, ज्ञानेश्वर आवारे, गण प्रमुख,साहेबराव चव्हाण, प्रमोद उशिर आदींनी केली

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या