चांदवड तालुक्यात लम्पी आजाराचे 60 टक्के लसीकरण
चांदवड (प्रतिनिधी ) : – चांदवड तालुक्यात लम्पी आजाराची आत्तापर्यंत 60 ते 70 टक्के लसीकरण झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव आहेर श्रेणी नंबर एक यांनी सांगितले.
त्यात चांदवड तालुक्यात धोडांबे येथील तीन लसीकरणाचे रुग्ण सापडल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी सांगितले. तसेच या आजाराचा जास्त प्रसार होऊ नये याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी व खाजगी व्यवसायिक डॉक्टर हे तालुक्यातील जागोजागी शेतात जाऊन जनावरांचे लसीकरण करीत आहे. चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी यांना लम्पी आजाराची मोफत लसीकरण आपल्या जनावरांना करून घ्यावे अशीही त्यांनी सांगितले. तसेच निमगव्हाण येथील शेतकरी नागेश ठोंबरे यांनी देखील या ठिकाणी लम्पी आजाराचे प्रसार होऊ नये याकरिता सर्वांनी लसीकरण घ्यावी अशी त्यांनी सांगितले.

