[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला खड्ड्यात पडून चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी

चांदवड – मनमाड महामार्गावरील हरणुल शिवारात मोटरसायकलस्वार खड्ड्यात पडून चार वर्षीय मुलगी गंभीर जखमी,
चांदवड मनमाड महामार्गाने सुतारखेडे येथील मंगेश दगु गांगुर्डे वय वर्षे चाळीस हे मोटरसायकल वरून चांदवड येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन घरी मंगेश दगू गांगुर्डे व त्यांची पत्नी व चार वर्षाची मुलगी अखिया मंगेश गांगुर्डे परतत असताना चांदवड तालुक्यातील हरणुल शिवारात रस्त्यावरील निकम वस्ती जवळ खड्डे वाचवीत असताना खड्ड्यात मोटरसायकल सह तिघेही पडले. त्यात चार वर्षे वयाची मुलगी अखिया मंगेश गांगुर्डे हिच्या तोंडाला व कानाला जबर मार लागला असून तिला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टर सोनवणे व त्यांच्या स्टॉप ने औषध उपचार केले आहे. अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून मिळत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या