[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेर भैरव येथील वडार वस्ती व वरचा कोळीवाडा येथे गावठी दारूच्या हातभट्टीवरती वडनेर भैरव पोलिसांची कारवाई तर एकूण 71 हजार रुपयाची रसायने हस्तगत

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वडनेर भैरव येथील वडार वस्ती व वरचा कोळीवाडा येथे गावठी दारूच्या हातभट्टीवरती वडनेर भैरव पोलिसांची कारवाई तर एकूण 71 हजार रुपयाची रसायने हस्तगत

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव चंद्रकांत खांडवी, उपविभागी पोलीस अधिकारी मनमाड समीर सिंह साळवे ,यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे ,पोलीस हवालदार रमेश आवारे, पोलीस हवालदार कोरडे ,व होमगार्ड या पथकाने आज दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी नऊ ते चारच्या दरम्यान ही कारवाई चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील वडार वस्ती व वरचा कोळीवाडा येथील गावठी दारूच्या हातभट्टीवर कारवाई केली असता .त्यात अकराशे लिटर गावठी दारू बनवण्याचे रसायन अंदाजे किंमत 55,000 तर 160 लिटर गावठी दारू किंमत अंदाजे 16,000 रुपये असे एकूण 71 हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनवण्याचे रसायन व गावठी दारू ताब्यात घेण्यात आली.

तर रसायन जागेवर नष्ट करण्यात आले असून, त्यावेळी गुलाब मोतीराम गायकवाड राहणार वरचा कोळीवाडा वडनेर भैरव तालुका चांदवड , कल्पना अर्जुन जाधव राहणार वडारवाडी वडनेर भैरव ,शहाण शामराव कापसे, छाया राजाराम जाधव राहणार वडारवाडी सर्व राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील असून यांना वडनेर भैरव या पोलिसांनी ताब्यात घेतले . त्यांच्यावर दारूबंदी अधिनियम चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा तपास वडनेर भैरव पोलीस करीत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या