देणेवाडी शिवारातील शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन 47 वर्षीय इसम मयत .
चांदवड तालुक्यातील देणेवाडी शिवारातील शेतातील चिंचेच्या झाडाला भाऊसाहेब खंडेराव जाधव वय वर्षे 47 यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास आत्मा केलेची घटना घडली असून.
तर देणेवाडी गावात शोककळा पसरली आहे. या संदर्भात मयतांचे बंधू, प्रसिद्ध कवी रावसाहेब खंडेराव जाधव यांनी चांदवड पोलिसात खबर दिल्यावरून चांदवड पोलिसांनी जाऊन शहा निशा करून पंचनामा केला.
त्यानंतर त्याचा मृत्यू देह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उत्तर तपासणी करण्याकरिता आणला असून त्याची उत्तर तपासणी डॉक्टर दळवी यांनी करून त्याचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.
यावरून चांदवड पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली. मात्र आत्महत्या कशामुळे केली हे आद्य कळाले नसून पुढील तपास पोलीस नाईक सुनिल जाधव करीत आहे.

