[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिवसेनेची निशाणी मशाल आणि वडनेर भैरवकरांच्या आठवणी

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

शिवसेनेची निशाणी मशाल आणि वडनेर भैरवकरांच्या आठवणी

चांदवड तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वडनेर भैरव या गावच्या राजकीय क्षेत्रात अनेक जिल्हा पातळीपर्यंत वेगवेगळ्या आठवणी आहेत अशीच एक आठवण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या संदर्भात पुन्हा उजळली गेली ती म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव हे राष्ट्रवादीत जाण्या अगोदर कट्टर आणि हाडाचे शिवसैनिक होते 1982 मध्ये त्यांनी सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांची निशाणी होती मशाल आज चांदवड तालुक्यातील प्रत्येक गावोगावी नागरिकांनी टीव्हीवर शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाले अशी बातमी बघताच 1982 साली उत्तम बाबा भालेराव यांनी मशाल या निशाणीवर निवडणूक लढविल्याच्या आठवणी चर्चिला गेल्या काही लोकांच्या माहितीनुसार उत्तम बाबा यांच्या निवडणुकीसाठी म्हणजेच प्रचारासाठी तत्कालीन अभिनेते कैलासवासी दादा कोंडके यांची चांदवडला सभा झालेली होती अशी ही आठवण अनेकांनी सांगितली तर शिवसेनेचे कामगार नेते साबीर भाई शेख हे पण प्रचाराला आल्याचे चांदवडला लोकांच्या लक्षात होते.

शिवसेना आणि मशालीचा इतिहास 🚩
शिवसेनेकडे या आधी मशाल हे चिन्ह होते.छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले होते.2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले.
1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि त्यावेळी पण चिन्ह मिळाले होते मशाल.या चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली!

थोडक्यात वडनेर भैरवकरांनी उत्तम बाबांना साथ देत हाती घेतलेली तेव्हाची मशाल आता काही दशकानंतर योगायोगाने शिवसेनेला निवडणूक चिन्ह म्हणून मशालच मिळाली हा खरंच योगायोग आहे सध्याचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख व वडनेर भैरव चे भूमिपुत्र सन्माननीय भाऊसाहेब चौधरी हे त्या काळातही उत्तम बाबांच्या प्रचारासाठी हातात भगवा घेऊन सहभागी झाल्याची आठवण वडनेर भैरव मधील अनेकांनी सांगितली.
भाऊ चौधरी हे नाशिकचे संपर्कप्रमुख आहे म्हणजेच थोडक्यात निष्ठावान शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये योग्य तो मानसन्मान दिला जातो हेच म्हणावे लागेल उत्तम बाबा भालेराव यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणण्यासाठी ज्या मीटिंग झाल्या त्यात एक मीटिंग ही हॉटेल रंगतला झाली. देशदूतचे संपादक कैलासवासी सुरेशजी अवधूत साहेब हे तानाजी तात्या बनकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेले असताना अवधूत साहेबांसोबत ,तानाजी तात्या बनकर,अनेक महत्वाचे नेते यात जोपुळ येथील उगले जयराम ,मी स्वतः सुरेश सलादे उपस्थितीत होतो. तेव्हा उत्तम बाबा खरोखरच राष्ट्रवादी जात आहे यावर माझा देखील स्वतःचा विश्वास बसत नव्हता परंतु सुरेश अवधूत यांनी काही चर्चा करताना महत्त्वाचे मुद्दे चर्चा केली आणि त्याचा साक्षीदार मी झालो होतो.
थोडक्यात वडनेर भैरव येथील माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांनी हाती घेतलेली मशाल त्यावेळी ची निवडणूक चिन्ह म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अधिकृत आयोग मान्यता निशाणी ठरलेली आहेतेपण ४० वर्षा नंतर हेच मला सांगायचे होते

– श्री सुरेश माधवराव सलादे वडनेर भैरव

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या