परिवर्तन ग्रुपतर्फे दरेगाव प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिवाळी म्हणून भेट
दरेगाव प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना अध्ययन सुधारण्यासाठी लहान वयोगटातील मुलांसाठी इंग्रजी अल्फाबेटिकली अक्षरे असलेले चार्ट व सांख्यिकी चार्ट इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपतर्फे दिवाळी भेट म्हणून देण्यात आला आहे. तसेच शालेय अभ्यासक्रम व इतर सामान्यज्ञान यांचा अधिकचा अभ्यास करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीतील होमवर्कसाठी मोठ्या वयोगटातील इयत्ता पाचवी ते सातवीचा वर्गातील विद्यार्थ्यांना भेट म्हणून नोटबुक देण्यात आले आहे .

यावेळेस विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख निकम , मुख्याध्यापक जनार्दन देवरे ,माजी मुख्याध्यापक सूर्यकांत गरुड , शाळेतील शिक्षक व परिवर्तन ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या हस्ते शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विक्रम देवरे समाधान गांगुर्डे ,प्रवीण देवरे बाबाजी देवरे राहुल गांगुर्डे ,अण्णा देवरे , अनिल गव्हाणे,निवृत्ती अहिरे, योगेश पगार, राहुल देवरे, राजू देवरे ,विकास गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे ,दत्तू पगार,अतुल देवरे, निवृत्ती देवरे आदी उपस्थित होते.

