[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोग्रसला एकात्मता दौड संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोग्रसला एकात्मता दौड संपन्न

सोग्रस, दिनांक 31 ऑक्टोबर 2022, येथील ग्रामपंचायत तसेच सोग्रस केंद्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संयुक्त आयोजनात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला यामध्ये चांदवडचे गटविकास अधिकारी माननीय महेश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. माननीय सरपंच श्री परशराम गांगुर्डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या कार्यक्रमात ग्रामसेवक श्रीमती पुष्पा भोये यांनी प्रास्ताविक केले उपस्थित सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ घेतली रावसाहेब जाधव यांनी रन फॉर युनिटी या कवितेचे सादरीकरण केले व त्यानंतर चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय महेश पाटील साहेब यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याचा परिचय देत राष्ट्रीय एकात्मता दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले यानंतर राष्ट्रीय एकात्मता दौड संपन्न झाली.

यामध्ये मा.गटविकास अधिकारी श्री महेश पाटील, सरपंच श्री.परशराम गांगुर्डे, माजी सभापती श्री.भास्कर गांगुर्डे, ग्रा.पं सदस्य श्री प्रकाश गांगुर्डे, सौ.इंदूबाई गांगुर्डे, सोग्रस केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विशाल पवार, सोग्रस माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब जाधव, सोग्रस प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका श्रीमती शोभा जाधव , भुत्याने प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री केदु देशमाने, सोग्रस उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री मनोज शिंदे, ग्रामसेवक श्रीमती पुष्पा देविदास भोये, पोलीस पाटील श्री. राजेंद्र गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, चेतन जाधव, श्री संतोष चव्हाण सर, बी आर बोरगुडे सर, के एम थोरमिसे, एस के गांगुर्डे, एम टी गांगुर्डे, के बी शिंदे, व्ही एच देवरे, ग्रामपंचायत कर्मचारी देवराम गांगुर्डे, अविनाश वाघ, संकेत गांगुर्डे आदिंसह बहुसंख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व पंचक्रोशीतील नागरिक राष्ट्रीय एकात्मता दौड यामध्ये सहभागी झाले…

सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने बिस्किटे वाटप करण्यात आले, तसेच मा. सरपंच श्री परशराम गांगुर्डे यांनी उपस्थित सर्वांचे तसेच टोलनाका रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सोबत करणारे आण्णासाहेब महाले आणि त्यांच्या टीमचे आभार मानले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या