[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुगाव येथे माळी समाजाचा ग्रामीण भागातील पहिला वधू – वर मेळावा संपन्न ..

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दुगाव येथे माळी समाजाचा ग्रामीण भागातील पहिला वधू – वर मेळावा संपन्न ..

शुभमंगल विवाह संस्था नाशिक आणि सद्भावना वधुवर सुचक मंडळ दुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेला सद्भावना लॉन्स दुगाव तालुका चांदवड येथे ग्रामीण भागातील पहिला मेळावा भरविण्यात आला व त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला एकूण 485 वधू वर यांची नाव नोंदणी करण्यात आली

पालकांसोबत आलेले जवळजवळ बाराशे लोकांची व्यवस्था या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट करण्यात आलेली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नाना बच्छाव नासिक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड येथील श्री टीपी निकम सर तसेच श्री बी एस बागुल सर श्री सोनवणे सर श्री बाळकृष्ण बच्छाव बेज केशव भाऊ पाटील कोळवाडी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री जाधव टी एन सर आणि श्री सोनवणे पी के सर यांनी केले मिळाव्यासाठी प्रचंड प्रतिसाद होता कार्यक्रमाचे आयोजक श्री सोनवणे पी के सर यांनी आभार मानले व मोठ्या उत्साहात ग्रामीण भागातील पहिला माळी समाजातील सर्व शाखीय वधू वर सूचक मेळावा पार पडला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या