[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

चांदवड (तालुका प्रतिनिधी ): – महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल मिडियामध्ये बोलताना आदरणीय खासदार,उत्कृष्ट संसदपटू सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अर्वाच्च भाषेत टिका केल्या बद्दल चांदवड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्री महोदय यांनी कृषी मंत्री यांची मंत्रीमंडळ मधून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.भारतीय संस्कृतीमध्ये सर्व क्षेत्रात स्रियांबद्दल नेहमीच आदर बाळगला जातो,परंतु विद्यमान शासन मधील अनेक आमदार व मंत्री सामान्य जनता व स्रिया याबद्दल अवमान कारक शब्द वापरत आहेत.याबद्दल त्यांच्यावर भारतीय संविधान नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.


चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले , याप्रसंगी नगरसेवक नवनाथ आहेर , तालुका अध्यक्ष युवक दत्ताभाऊ वाघचौरे ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाअध्यक्ष साधनाताई पाटील ,शहराध्यक्ष चित्राताई शिंदे ,कल्पना शिरसाट , चांदवड शहराध्यक्ष प्रकाशजी शेळके ,सुनील तात्या कबाडे , शैलेश ठाकरे , अनिल पाटील , विक्रम जगताप ,आल्ताफ तांबोळी, शिवाजी सोनवणे ,संदीप शिंदे, कार्याध्यक्ष विजूनाना गांगुर्डे , अध्यक्ष विकी जाधव ,सागर साठे, हरी निकम, रमेश वाकचौरे ,चेतन देशमाने ,अमोल शेलार, ऋषिकेश सोनवणे ,यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या