मनमाड महाविद्यालया तर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे शिंगवे येथे समारोप
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलीत, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे १२५ स्वयंसेवकांकडून शिंगवे (मतोबा) येथे श्रमदान करून समारोप संपन्न झाले. या समारोपप्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम आवारे,जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका लीला सोनवणे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले.
या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये विशेष श्रमदान केलेल्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरादरम्यान वीस वर्षापासून बंद असलेली स्वच्छतागृह सुरू करण्यात आले, शालेय परिसराची व मंदिराची स्वच्छता, नेत्र तपासणी शिबिर , दत्तक गावाचा इतिहासचा अभ्यास व सर्वेक्षण, ग्रामविकास सर्वेक्षण, डॉ. प्रशांत खैरे यांचे आरोग्य जनजागृती वरील व्याख्यान, प्रा.ज्ञानेश्वर बोगीर यांचे युवक व स्पर्धा परीक्षा यावरील मार्गदर्शन, प्रगतीशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे वातावरण बदलावरील अनुभव पर व्याख्यान,बोरसे बाबा यांचे विद्यार्थी कसा असावा याविषयी मार्गदर्शन ओंकार पगार व योगेश गोसावी यांचे तबला व पेटीवरील प्रशिक्षण पर मार्गदर्शन यासारख्या विविध उपक्रमांवर श्रमसंस्कार व जनजागृती करून शिबीर यशस्वी झाले. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रामुख्याने ‘युवकांमध्ये खरे श्रम संस्काराचे महत्त्व समजावणारी योजना म्हणजे एनएसएस’, ‘देश घडवण्यासाठी वाचन संपन्न, इच्छाशक्ती संपन्न व कार्यसंपन्न युवकांची आज आवश्यकता आहे, यासाठी युवकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे’ यावर भर देण्यात आला .
यावेळी उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, उपप्राचार्य ज्योती पालवे,पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे,पर्यवेक्षक विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, डॉ गणेश गांगुर्डे, प्रा. सौ. वर्षाराणी पेडेकर,प्रा सि. डी.ठाकूर,प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाले याने केले.

