जल जीवन मिशन अंतर्गत हस्तांतरित करण्याचे सरपंचाचे अधिकार काढण्याच्या बातमी बाबत चांदवडला गटविकास अधिकाऱ्यांना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले निवेदन
चांदवड:-.
जलजिवन मिशन अंतर्गत हस्तांतरित करण्याचे सरपंचाचे अधिकार काढण्याच्या निर्णयाबाबत
टेंडरनामा न्युजची जलजीवनच्या योजनांचे हस्तांतरण आता सरपंचाऐवजी (सरपंचाच्या मागे धावण्यातून ठेकेदारांची सुटका) या बातमीच्या संदर्भानुसार शुक्रवारी चांदवडचे गट विकास अधिकारी महेश पाटील यांना तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी निवेदन दिले व यावेळेस तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच या संदर्भातील निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना देण्याचे ठरले. यावेळेस जल जीवन मिशन संदर्भात विविध अडचणी व कामे जलद गतीने होण्यासाठीच्या सूचना सरपंचांनी मांडल्या तसेच चांदवड येथे तालुक्यातील सरपंचांची येत्या मंगळवारी दि. 24 रोजी विशेष बैठक आयोजित करणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा,
वरिल विषयान्वये कळविण्यात येते की, जलजीवन नावच्या योजना (हर घर जल) हि चांदवड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये सुरू झाली आहे. काही गावामध्ये तांत्रिक मंजुरी स्थीतीत आहे. परंतु याही पूर्वी या कामाच्या संबंधात ग्रामपंचायत स्थरावर किंवा सरपंच यांना त्या कामाचे आदेश व कार्यारंभ आदेश व अंदाजपत्रक अदयापही दाखवण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यातील गावामध्ये आधीच योजना पूर्ण झाल्याचे दर्शवले जात, त्याचे परिणाम गाव स्थरावर वादविवादातू होत आहे.

या योजनेमध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवावे. असे केंद्र सरकाचे ध्येय आहे “मग असे का” वरील योजनेत ठेकेदार यांची मनमानी कारभार होत आहे. अंदाज पत्रकाद्वारे कामे पूर्ण व्हावे व ते काम सुरू असतांना त्या संबंधीत अधिकारी, उपकार्यकारी अभियंता, तसेच त्या संबंधित सर्व अधिकारी यांनी पाहनी करतांना किती टक्के काम झाले व कसे पूर्ण केले हे त्या गावातील ग्रामपंचायत शेरे बुकवर शेरा देणे म्हणजे त्याचे बिल देण्यास ग्रामपंचायतीस अवगत असेल,
तरी ही वरील विषयानव्ये जी बातमी आली आहे त्याचा सविस्तर खुलासा करून जलजिवन मिशन अंतर्गत हस्तांतराचे अधिकार सरपंचाकडे कायम ठेवावे.जोपर्यंत सदर योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत होत नाही तो पर्यंत संबंधीत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे बिल अदा
करण्यात येऊन ही नम्र विनंती, अन्यथा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी यांच्या वतीने
प्रशासनाना विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असे निवेदनात म्हंटले आहे निवेदन गट विकास अधिकारी महेश पाटील यांना देताना तालुक्यातील यावेळी मनोज जगन्नाथ शिंदे राजधेरवाडी, संजय महाराज शिंदे, सविता काशिनाथ शिंदे कानमंडाळे सरपंच, रेखा योगेश ढोमसे मंगरुळ सरपंच,अनिता समाधान जामदार आहेरखेडे सरपंच, दत्तात्रय भिकाजी गांगुर्डे सुतारखेडे ग्रा. प. सदस्य , वैशाली विक्रम देवरे दरेगाव ग्रा. प. सदस्य,राजेश लक्ष्मण गांगुर्डे कळमदरे उपसरपंच,दत्तु मोठाभाऊ शेळके काळखोडे उपसरपंच, गोकुळ खंडू वाघ डोणगाव सरपंच,
संदिप दगु कोकणे वाके बुद्रुक उपसरपंच ,साहेबराव परसराम चव्हाण पाटे उपसरपंच, संदिप जेजूरे,डोणगाव उपसरपंच, सिताराम रामदास मांदळे नारायणगाव उपसरपंच ,
पवन साहेबराव जाधव सरपंच चिंचोले
कविता श्रीहरी ठाकरे उर्धुळ सरपंच ,वाल्मीक दिलीप वानखेडे , सुतारखेडे उपसरपंच ,भाऊसाहेब तुकाराम शेलार गंगावे उपसरपंच , पुजा दर्शन अहिरे खडकजांब सरपंच ,
सारिका किशोर चव्हाण वडगावपंगू सरपंच ,कैलास दादाजी गुंजाळ, नन्हावे सरपंच, कैलास भिकाजी माकुणे वडगावपंगु ग्रा.प. सदस्य, संगिता दिगंबर वाघ जोपुळ सरपंच , संजय दामू जाधव, दरेगाव ग्रा. प. सदस्य,रंजनाबाई रामदास पानसरे पुरी सरपंच, यांच्यासह समाधान जामदार , अक्षय माकुने, विक्रम देवरे,विलास संसारे ,जनार्दन खैरनार , ईश्वर संसारे, संघरत्न संसारे यांच्यासह विविध नागरिक उपस्थित होते.

