गुरुवारी चांदवडमध्ये महाराजा यशवंतराव होळकर महोत्सव
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा
चांदवड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोधसंस्थान अंबड व आबड कला, श्री. लोढा वाणिज्य, श्री जैन विज्ञान महाविद्यालय चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता चांदवड येथील श्रीमान मोहनलाल चंपालाल सांखला ऑडीटोरीअम, स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालय, नेमीनगर, चांदवड येथे महाराजा यशवंतराव होळकर महोत्सव, चांदवड 2023 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.जी.एच जैन व कार्यक्रमाचे समन्वयक इतिहास संशोधक रामभाऊ लांडे व प्रा. संदीप पगार यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून होळकर राजघराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर महाराज तर अध्यक्षस्थानी चांदवड येथील एस.एन.जे.बी. नेमीनगरचे मानद सचिव जवाहरलालजी आबड हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून चांदवड-देवळाचे आमदार डॉ. राहुल आहेर, तळोदा संस्थानचे जहागिरदार श्रीमंत अमरजितराजे बारगळ तसेच गॅझेटियर विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप प्र. बलसेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. देविदास पोटे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी प्रा.ज्ञानेश्वर गवळीकर, संजय बिरार यांना सुभेदार मल्हारराव होळकर राज्यस्तरीय साहित्य लेखन पुरस्कार, प्रा. गणेश मस्के, उज्ज्वलकुमार माने यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय संशोधन लेखन पुरस्कार, संदीप पाटोळे, लळींग किल्ला संवर्धन समिती, रोहन जाधव, रोहन काळे, महाराष्ट्र बारव मोहीम यांना महाराजा यशवंतराव होळकर राज्यस्तरीय वारसा संवर्धन पुरस्कार, सुनील तांबे, आनंद गावडे यांना जहागिरदार भोजराज बारगळ राज्यस्तरीय कला पुरस्कार, प्रणव पाटील, कृष्णा गुडदे यांना स्व. रुस्तुमराव लांडे राज्यस्तरीय संशोधक मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला डाँ.मनोज पगारे, डाँ दत्ता शिंपी, डॉ. मनोज पाटील डॉ .तुषार चांदवडकर,उदय वायकुळे, संजय पाडवी,प्रा.विजया जाधव,प्रा.श्रीकांत ढापसे,प्रा.हर्षदा आहेर उपस्थित होते.

