दरेगाव येथे डाळिंब शेती प्रशिक्षण कार्यशाळा
माती परिक्षण,जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, रासायनिक, सेंद्रिय व जैविक निविस्ठांचा प्रमाणात गरजे ईतकाच संतुलित ऊपयोग, संतुलित कर्ब-नत्र गुणोत्तर, हिरवळीच्या खतांचा उपयोग, जमिन व झाडांच्या विश्रांती कालावधी मधील वाढ शेतीला,शेतकऱ्यांना व डाळिंब झाडांंना समृद्ध बनवेल. झाडाच्या क्षमतेपेक्षा जास्त फळे म्हणजेच आजारांना आमंत्रण यासाठी विरळणीसह डाळिंब झाडाच्या वर्षांतील महत्त्वपूर्ण तीन अवस्थांचा अभ्यास करून डाळिंब शेती यशस्वी करावी.
त्याचबरोबर तेल्यारोग व मररोगावरील 46 कारणे व उपाययोजनांसह अनेक मुद्यांवर श्री.सोमनाथ गांगुर्डे (लेखक – भारतीय डाळिंब शेतीची आवश्यकता) यांनी मार्गदर्शन केले.
डाळिंब शेती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दरेगाव ता.चांदवड येथे दिपक आहेर,प्रविण देवरे,विक्रम पगार, सागर गांगुर्डे, सोमनाथ देवरे,संदिप गांगुर्डे,राजेंद्र देवरे व सर्वच शेतकरी यांनी केले…

