दरेगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी रामभाऊ देवरे ,तज्ञ संचालक पदी सुरेश गरुड तर बँक प्रतिनिधी प्रल्हाद देवरे यांची निवड
दरेगाव वि. का. सहकारी. सेवा. सोसायटीची मासिक मीटिंग संपन्न झाली .त्यामध्ये नवीन स्वीकृत , तज्ञ व बँक प्रतिनिधी याची निवड करण्यात आली.सदस्यांची निवड संस्थेचे सभापती भाऊसाहेब गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली स्वीकृत सदस्य पदी रामभाऊ म्हातारबा देवरे तज्ञ संचालक पदी सुरेश कचरू गरुड बँक प्रतिनिधी प्रल्हाद मुरलीधर देवरे यांची निवड एकमताने करण्यात आली .नवनिर्वाचित तीनही संचालकांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे उपसभापती सुनीता समाधान गांगुर्डे ,संचालक भाऊसाहेब देवरे ,दिनेश पगार, राजेंद्र देवरे , विक्रम गांगुर्डे , माधव देवरे , संजय गांगुर्डे ,भाऊसाहेब जाधव , रतन गांगुर्डे , ताराबाई गांगुर्डे , एकनाथ अहिरे ,मधुकर परदेशी आदींसह संस्थेचे माजी सरपंच नथू लक्ष्मण देवरे , माजी चेअरमन बबन गांगुर्डे , महारु गांगुर्डे , तुकाराम देवरे ,मनोहर देवरे बाबाजी देवरे तसेच संस्थेचे सचिव बी. एस. व्हडगर , क्लार्क महेंद्र गांगुर्डे उपस्थित होते . नवनिर्वाचित तीनही संचालकांचे अभिनंदन करण्यात आलं व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.

