[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

तळेगांव रोही येथे लवकरच साकारणार सांस्कृतिक भवन : अंबादास केदारे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

तळेगांव रोही येथे लवकरच साकारणार सांस्कृतिक भवन : अंबादास केदारे

प्रतिनिधी ( चांदवड ) चांदवड तालुक्यातील मौजे तळेगाव रोही येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने २०२१-२०२२ अंतर्गत सांस्कृतिक भवन बांधकाम भूमिपूजन वंदनीय भारत ध्वज भंतेजी , वंदनीय गुनप्रभा भंतेजी तथा रामभाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आले. हयावेळी अंबादास केदारे यांनी इथल्या शासन व्यवस्था व राजकारणी व्यवस्थेला जाहिर आवाहन करण्यात आले आहे की, सदरहू कामे हि सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य शासन यांची योजना असून त्यात तळेगाव रोही आणि आजूबाजूच्या परिसरातील ७ गावांकरिता ही योजना सन २०२१-२०२२ मध्ये प्रत्येकी गावाकरिता २५ लाख रुपये निधी मंजूर असुन ही कामे सार्वजानिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद ने ज्या ठेकेदारास दिलेले आहे. त्या ठेकेदाराने अद्याप पर्यंत कामे पूर्ण केली नाही. ही सर्व कामे एकुण २ करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदरहू कामे लवकरात लवकर पूर्ण करावी , अशी मागणी करण्यात आली आहे.


हया भूमिपूजन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तळेगांव रोहीचे नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब जिरे ( सर ) उपसरपंच सौ. शोभाताई रोकडे, सुरेशजी रोकडे, अंबादासजी केदारे कार्यकारणी सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य, प्रा.राजेंद्रजी वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य शरदजी गाढे, पुंजारामजी वाकचौरे, सौ.वनिता केदारे, गणेशजी वाकचौरे, तळेगाव रोही पोलिस पाटील अविनाशजी अहिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी संपत वाकचौरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, शशिकांत केदारे, भाऊसाहेब केदारे, विनायक केदारे, बाळासाहेब गीते, अशोक वाकचौरे, विक्रम वाकचौरे, सिताराम ठाकरे, अन्वर पठाण, लालू मोरे, श्रावण मोरे, धनाजी मोरे, प्रल्हाद केदारे, दादा कृष्णा केदारे, सोन्या भाऊ केदारे, दिलीप केदारे, बबन केदारे, महेंद्र केदारे, प्रल्हाद भोकनळ, भाऊका शेठ भोकनळ, रेवण सोनवणे, मधुकर वाकचौरे, व हया कार्यक्रमाचे संयोजक समिती प्रमुख दिवाकर केदारे, आनंद केदारे, कॉ.सुखदेव बाबा केदारे, रविन्द्र गंगाधर केदारे व ग्रामपंचायत तळेगाव रोही, गावातील सामाजिक, राजकिय संघटना भारतीय बौद्ध महासभा, आर.पी.आय, वंचित बहुजन आघाडी, अनु.जाती मोर्चा भाजपा, शिवसेना शाखा तळेगाव रोही, पँथर सेना तळेगाव रोही हया सर्व संघटनांनी कार्यक्रम यशस्वी केला…

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या