वराडी येथील सार्वजनीक वाचनालयाला कुंदलगाव शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यासपुर्ण क्षेत्रभेट.
चांदवड तालुक्यातील पुर्व भागात वसलेले छोटेशे वराडी हे गाव शिक्षण प्रेमी म्हणुन ओळखले जाते. पुस्तक हे माणसाला घडवतात. पुस्तकापुढे टेकलेले मस्तक कधीच कोणाकडे नतमस्तक होत नाही. म्हणुनच गावातील ध्येयवेड्या तरूणांनी भव्य सार्वजनीक ग्रंथालयाची उभारणी केली आहे. अध्यात्मिक, सामाजीक, राजकिय, कला, क्रिडा, व स्पर्धां परिक्षेसाठी उपयुक्त ग्रंथ उपलब्ध करण्यात आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत वाद-वराडी, अनेक अभ्यासप्रेमी विचारवंत तसेच सामाजीक संस्थानी ग्रंथालय उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. एक वर्षापासुन हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. जवळच्या जनता विद्यालय कुदंलगाव या शाळेतील शिक्षकांना हा उपक्रम माहीत झाला आणि त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपुरक सहलीचे आयोजन केले. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाला भेट देऊन पुस्तकांचे वाचन केले.
गावातील मुलांनी या संदर्भ ग्रंथाचे व वैचारीक पुस्तकांचे वाचन करुन मोठ्या पदावर जाऊन आपल्या गावचे नाव रोशन करावे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. याप्रसंगी जनता विद्यालय कुंदलगाव व प्राथमिक शाळा वराडी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, गावचे उपसरपंच पंढरीनाथ खताळ, ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता गायकवाड, वकील कौतिकराव आहेर, अनिल गायकवाड, अंनतराव आहेर, पुंजाराम गायकवाड, नितिन दाभाडे, व गावातील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुस्तक प्रेमी भाऊसाहेब गायकवाड व भाऊसाहेब दाभाडे सर यांनी विशेष प्रयत्न केले.

