चांदवड येथे कांदा व द्राक्ष उत्पादकांचे सुरु असलेले आमरण उपोषण तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित
मा.आ.श्री. शिरिषकुमार वसंतराव कोतवाल, श्री.संजय दगूजी जाधव व इतर 41 शेतकरी बांधव यांनी कांदा, द्राक्ष व इतर भाजीपाला शेतीमालास योग्य बाजारभाव मिळणे व इतर शेतकरी हिताच्या मागण्यांकरीता शुक्रवार दि.03/03/2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपासुन कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड येथे आमरण उपोषणास सुरुवात केली होती.
दि.03/03/2023 रोजी मा.उपविभागीय अधिकारी, चांदवड उपविभाग, चांदवड, मा. तहसिलदार, चांदवड, मा.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, चांदवड बाजार समितीचे प्रशासक/सचिव व मा.पोलीस निरिक्षक, चांदवड यांनी उपोषणकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आपण आमरण उपोशन मागे घ्यावे हि विनंती केली होती, मात्र उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण सुरु ठेवून उपोषणाच्या दुस-या दिवशीही उपोषण सुरु होते. 
त्यानुसार दि.04/03/2023 रोजी सांयकाळी 04.00 वा. उपोषणकर्त्यांशी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री मा.ना.भारतीताई पवार, श्री. विनायक कोकरे मा. पणन संचालक सो., महाराष्ट्र राज्य, पुणे, माजी पणन संचालक श्री.सुनिल पवार,श्री. सतिश खरे मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, यांनी फोनद्वारे चर्चा करुन व श्री.चंद्रेशेखर देशमुख मा. उपविभागीय अधिकारी, चांदवड उपविभाग चांदवड, श्री. प्रदिप पाटील-तहसिलदार, चांदवड, श्री. समिर बारवकर, पोलीस निरीक्षक, चांदवड, श्रीमती सविता शेळके, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड, चांदवड बाजार समितीचे प्रशासक श्री. अनिल पाटील यांनी समक्ष भेट घेवून त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करुन उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषणापासुन परावृत्त व्हावे, असे आवाहन केले. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितले सरकार तुमच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो विचार करत आहे तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेते. त्यामुळे तुम्ही तुमचे उपोषण मागे घ्यावे हि विनंती केली.
एकरी कांदा लागवडी पासून काढण्या पर्यंत एकरी 1,80,000/- रुपये. खर्च येत असून शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्च देखील सुटत नाही. कमी भावात विक्री झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. नाफेडने प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये येऊन योग्य भावात कांदा खरेदी करावा ,आमच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा स्थगित उपोषणास सुरुवात करुन शेतकरी हिताचा लढा सुरु ठेवण्यात येईल, असे श्री.संजय दगूजी जाधव यांनी सांगितले.
रविवार सोमवार मंगळवार या तिनही दिवशी सरकारी कामकाजाला सुट्टी आली असता सरकार ला आमच्या मागण्यांसंदर्भात विचार करायला वेळ मिळावा म्हणुन आम्ही आमचे उपोषण स्थगित करत आहोत असे मा.आ.शिरीष कोतवाल यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे हेदेखील यावेळी उपस्थित होते, मा.आ शिरीष कोतवाल, संजय दगुजी जाधव, भीमराव जेजुरे, शिवाजी कासव, विजय जाधव संपतराव वक्ते समाधान जामदार. अन्वर पठाण दत्तूमामा ठाकरे विजय कुंभार्डे, भीमराव निरभवणे, दिपांशु जाधव, बापू शिंदे, किसनराव जाधव, पप्पू कोतवाल, पंकज दखने, बाळासाहेब शिंदे, कैलास कोतवाल, नंदू कोतवाल, देवाजी वाघ व असंख्य शेतकरी उपस्थित होते


रविवार सोमवार मंगळवार या तिनही दिवशी सरकारी कामकाजाला सुट्टी आली असता सरकार ला आमच्या मागण्यांसंदर्भात विचार करायला वेळ मिळावा म्हणुन आम्ही आमचे उपोषण स्थगित करत आहोत असे मा.आ.शिरीष कोतवाल यांनी सांगितले.