[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

शिंगवे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

शिंगवे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सन 2022/2023 इ 10 वी च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद /निरोप देण्याचा कार्यक्रम मंगळवार दि.28/02/2023 रोजी माध्यमिक विद्यालय शिंगवे ता. चांदवड येथे आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक जिल्हा शिक्षक सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री डी.एल.ठाकरे हे उपस्थीत होते तसेच गुरुदेव दत्त विद्या प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री तुकाराम तात्या खताळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री यु.एच. आवारे सर होते तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक श्री पवार सर,श्री सुखदेव बोरसे,श्री चव्हाण सर,श्री सोनवणे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इ.10 वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते श्री माळी सर यांनी सूत्रसंचालन केले व श्री वाले सरांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या