रेडगांव खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदी विजय काळे यांची बिनविरोध निवड
चांदवड दि 20 रेडगांव खुर्द ता चांदवड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतीपदी विजय काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

रेडगांव सोसायटी सभापतीपदी विजय काळे यांच्या निवडीप्रसंगी सत्कार करताना प.स.माजी सभापती संचालक मंडळ
विद्यमान सभापती तथा प. स .माजी सभापती अनिल काळे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने सदरचे पद रिक्त झाले होते .आज नूतन सभापतीपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी किशोर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी विजय काळे यांचा एकमेव अर्ज आल्यानेत्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली .त्यांना संस्थेचे सचिव राजेंद्र सोनवणे यांनी सहाय्य केले .यावेळी प.स. माजी सभापती अनिल काळे उपसभापती हरिभाऊ काळे सुनील काळे ताराबाई काळे शंकर काळे सुधाकर काळे उत्तम काळे रावबा काळे काशिनाथ गरुड सदस्य , सरपंच यादव गरुड रविंद्र काळे धर्मेश गरुड विजय काळे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

