[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता

शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय चार दिवसातच होईल: कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे पन्हाळे येथे प्रतिपादन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

कृषिमंत्री यांच्या पाहणीचा नियोजित वेळ हा सायंकाळी सहा वाजेचा होता परंतु ते रात्री नऊ वाजता पोहोचले त्यामुळे त्यांनी आल्या आल्या उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच दुपारपर्यंत आपण अधिवेशनात होतो .त्यामुळे येण्यास उशीर लागल्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय चार दिवसातच होईल: कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे पन्हाळे येथे प्रतिपादन

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय चार दिवसातच होईल. येथील शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे, या नुकसानीच्या क्लिप मी टीव्ही आणि मोबाईलवर बघितल्या आहे. मात्र मदतीचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही . तुमच्या व्यथा आणि भावना मी मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचवणार असून 25 तारखेच्या आत शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय नक्की होईल. असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले .ते पन्हाळे ता चांदवड येथे काल गारपिटीने उध्वस्त झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी आले असता शेतकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. मदतीपासून एकही नुकसान ग्रस्त शेतकरी बाकी राहता कामा नये. यासाठी अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ आणि वास्तव पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार रात्री नऊ वाजता आल्याने पिकांची पाहणी करणे शक्य नसल्याने त्यांनी थेट एक तास शेतक-यांशी संवाद साधला .यावेळी सूर्यभान वाघ या शेतकऱ्याने मंत्र्यांपुढे कैफियत मांडली. गारपिटीने संपूर्ण कांदा पीक सडले गेले. कांदा बियाण्याचे प्लॉटही नष्ट झाले .त्यामुळे खरीप हंगामात मोफत कांदा बियाणे पुरवावे. तसेच तात्काळ मदत घोषित करावी. जिल्हा बँकेच्या ठेवीमधून कर्ज रक्कम भरणा करावी. उर्वरित ठेवी शेतकऱ्यांना तात्काळ मिळाल्यात अशी मागणी केली. विजय कुंभार्डे यांनी मागील वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान अजून मिळाले नाही. ते तात्काळ मिळावे .पीक विमा भरपाई मिळावी या मागण्या मांडल्या. एका युवा शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना पन्हाळे गाव दत्तक घेण्याची मागणी केली.

पन्हाळे ता चांदवड येथे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतक-यांशी संवाद साधताना कुषीमंत्री अब्दुल सत्तार

कांदा अनुदान तीन महीन्यांसाठी द्यावे _-डॉ कुंभार्डे यांची मागणी

शेतक-यांच्या वतीने डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी मंत्र्यांपुढे सगळ्या नुकसानीचा गोषवारा पुढे ठेवला. तसेच सरकारने कांद्याला 350 रुपये अनुदान जाहीर केले. मात्र कालावधी निश्चित नसल्याने शेतकरी संभ्रमात आहे .त्यामुळे सरकारने निर्णय घेताना जानेवारी ते मार्च या तीनही महिन्यांचा समावेश करावा .अशी मागणी केली तसेच पन्हाळे गावातील नुकसान हे भयंकर असून सरकारने गावासाठी एखादे पॅकेज घोषित करावे .अशी मागणी केली.
शेतकऱ्यांच्या सर्व व्यथा व वस्तुस्थिती आपण मुख्यमंत्र्यांसमोर समोर मांडू.तसेच योग्य ती मदत सरकार करेल असे सत्तार यांनी सांगितले. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी प. स .सभापती डॉ. नितीन गांगुर्डे ,वर्धमान पांडे ,सरपंच बाबुराव कुंभार्डे, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, कृषी अधिकारी विलास सोनवणे ,यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या