आज माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड येथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती
विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका व मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी श्री पुनमचंद खताळ तसेच विद्यालयांचे मुख्याध्यापक श्री आवारे सर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी सरस्वती मातेची पूजन इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी साक्षी संदीप गुंड हिने केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शिंगवे सोसायटीचे चेअरमन श्री संजय अहिरे यांनी केले
याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे जीवनावरील माहिती सांगितली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माळी सर व मुख्याध्यापक श्री आवारे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉ बाबासाहेबांचे जीवनावरील विचार मांडले याप्रसंगी श्री वाले सरांनी व शेळके सरांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी विद्यार्थिनींना चॉकलेट वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व डॉ बाबासाहेबांच्या जन्मदिनी विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले

