[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सर्वसामान्य कुटुंबातील कातरवाडीच्या प्राजक्ता झाल्टेने दहावीच्या परीक्षेत काजीसांगावी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला .

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावची प्राजक्ता झाल्टे या तरुणीने दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील कातरवाडीच्या प्राजक्ता झाल्टेने दहावीच्या परीक्षेत काजीसांगावी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला .

मराठा विद्या प्रसारकसमाजाचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी या विद्यालयाचा
इयत्ता १० वी मार्च २०२३ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल 94.31% लागला असून
मार्च २०२३ परीक्षेत विद्यालयातील पहिले पाच विद्यार्थी अनुक्रम
झाल्टे प्राजक्ता विश्वनाथ – 92.20 ,
आहेर श्रुती पंढरीनाथ – 91.20 ,
काळे श्रेया रविंद्र – 90.80 ,
पवार वैभव भाऊसाहेब – 89.40 ,
ठाकरे निलम उत्तम – 87 याप्रमाणे टक्केवारी विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावची प्राजक्ता झाल्टे या तरुणीने दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन करणाऱ्या प्राजक्ता झाल्टेची शैक्षणिक वाटचाल सुरुवातीपासूनच नेत्रदीपक राहिली आहे. आई वडिलांचे कष्ट आणि मामांची व भावंडांची खंबीर साथ यांचा देखील त्याच्या या यशात मोलाचा वाटा आहे. काजीसांगवी या गावी मच्छिंद्र भाऊसाहेब आहेर या मामांच्या घरी राहून तिथे शिक्षण पूर्ण केले.ग्रामीण भागातील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील तरुणीने मिळवलेले हे यश नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे याच कुटुंबातील उच्च पदावर असणारे रावसाहेब भाऊराव झाल्टे यांनी सुद्धा 1981 मध्ये याच विद्यालयात शिक्षण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला होता व त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे . प्राजक्ताला, पुढील वाटचालीसाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक वर्गाने शुभेच्छा दिल्या आहेत.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या