येवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल १००% लागला असून विद्यालयाची तेजस्वी सुकदेव आहेर 93.80% गुण मिळवत येवला ब केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
द्वितीय क्रमांक दिपाली सोनवणे व संस्कृती घुगे प्रत्येकी 93.40%, तृतीय राकेश खैरनार 93.00%, चतुर्थ क्रमांक प्रांजल गोसावी व श्रीराज कांबळे प्रत्येकी 92.60% तर पाचवा क्रमांक भाग्यश्री महाले व शितल साताळकर प्रत्येकी 92.00% यांनी मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल, चिटणीस सुशीलभाई गुजराथी, कोषाध्यक्ष डॉक्टर मनीष गुजराथी, प्राचार्य शुभांगी खाखरिया, पर्यवेक्षक दत्तकुमार उटावळे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख कैलास धनवटे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना चंपा रणदिवे, आसावरी जोशी, प्रसेन पटेल, राम पटेल, अनिल शेलार, विजय पैंजणे, प्रेरणा जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन करणाऱ्या तेजस्वीची शैक्षणिक वाटचाल सुरुवातीपासूनच नेत्रदीपक राहिली आहे. तेजस्वीचे हे यश म्हणजे आई-वडिलांचे कष्ट, विद्यालयातील शिक्षकांचे परिश्रम व तिचे प्रामाणिक प्रयत्न यांचा परिपाक आहे.
खरं तर दोन वर्षांपूर्वी तेजस्वीच्या एकुलत्या एक मोठ्या भावाचं अपघाती निधन झालं… अत्यंत दुःखमय वातावरणामध्ये कुटुंबातून स्वतःला सावरत जिद्द, मेहनत व चिकाटी च्या बळावर आई वडिलांचे अपुर्ण स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने मेहनत घेत तेजस्वीने हे यश संपादन केले आहे. तीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…
तेजस्वीच्या पुढील वाटचालीसाठी व उज्वल भवितव्यासाठी समाजातील सर्वच स्तरांमधून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…

