डोणगाव तालुका चांदवड येथे “शासन आपल्या दारी” या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते शासकीय दाखले वाटप करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना योजना सामावून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून सर्वसामान्य नागरिकांना संबंधित योजनेचा ताबडतोब लाभ द्यायचा आहे. चांदवड तालुक्यातील डोणगाव येथील राधाकृष्ण लॉन्स येथे “शासन आपल्या दारी” या शासकीय उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बोलत होते.
यावेळी आ. आहेर यांनी सांगितले की केवळ जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले रेशन कार्ड इतकाच हा मर्यादित कार्यक्रम नसून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात वैयक्तिक लाभाचे प्रमाण वाढायला हवे येथे 15 ऑगस्टला चांदवडला महाराजस्व अभिनयान राबविण्यात येणार आहे . पी एम किसान योजनेबरोबरच आता राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान योजना अमलात आणली आहे त्यासाठी सर्वांनी केवायसी करून घ्यावी तसेच राष्ट्रीयकुत बँकाकडून पीक कर्ज वाटप साठी सिबिल स्कोर ची अट शासनाने रद्द केली आहे. सामान्य नागरिकांपर्यंत सर्व योजना पोहचवतील , तेव्हाच शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी होईल , असेही आमदार राहुल आहेर यांनी सांगितले.
यावेळी लाभार्थ्यांना रेशन कार्ड, उत्पन्न दाखले, बचत गटाचे कर्ज, विविध शासकीय दाखले, जातीचे दाखले, दिव्यांग बांधवांना योजना, मागेल त्याला शेततळे, गोल्डन कार्ड, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प (बेबी किट) या योजनांचा लाभ घेण्यासाठी दोन गाव या पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्री.चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तहसिलदार मंदार कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नायबतहसीलदार खेडकर यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे, जेष्ठ नेते श्री. पंढरीनाथ खताळ, श्री.योगेश ढोमसे, श्री. विजय धाकराव, सौ. गीता ताई झाल्टे, निमोन सरपंच डॉ. स्वाती देवरे, डॉ. भाऊराव देवरे, शिंगवे सरपंच श्री. आत्माराम खताळ, डोनगाव सरपंच गोकुळ वाघ, वाद सरपंच प्रविण आहेर , दरेगाव सरपंच सरला पवार, श्री. अंबादास ठोंबरे, भिमराव जेजूरे, वर्धमान पांडे , विजयनाना गांगुर्डे, नथू देवरे , एन. डी. देवरे , उत्तम गांगुर्डे, प्रविण बोडके, गजानन पगारे, दिनकर आहेर, संजय गांगुर्डे, हनुमान दखणे , आदींसह तहसीलदार श्री. मंदार कुलकर्णी व सर्व विभागातील अधिकारी तसेच मेसनखेडे गणातील दरेगाव ,निमोण ,कुंदलगाव, कानडगाव ,वाद ,वराडी, शिंगवे, डोणगाव ,मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक, कोकण खेडे, दहेगाव मनमाड येथील नागरिक व विद्यार्थी प्रमाणपत्र ,नॉन क्रिमीलेअर यासाठी शिबिराचे आयोजन केलेले होते. सदर शिबिरात तलाठी ,आपले सरकार केंद्र चालक, इत्यादी सर्व एका छताखाली उपलब्ध झाले होते. . विविध गावातील तलाठी ,सरपंच ,पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्यविभाग, पोस्ट विभाग, शिक्षण विभाग, कृषी विभाग, व विविध विभागाचे अधिकारी आपले सरकार केंद्र चालक ,सेतू सुविधा केंद्र आदी उपस्थित होते.ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

