चांदवड बाजार समितीचे आवारावर कांदा, टोमॅटो व भाजीपाला विक्रीस आणावा व मालविक्रीची रक्कम रोख घेण्यात यावी : सभापती-संजय जाधव
चांदवड- बाजार समितीचे मुख्य बाजार आवारावर भाजीपाला व टोमॅटो शेतीमालाची दैनंदिन आवक होत असुन विक्री केलेल्या मालाची रोख स्वरुपात रक्कम अदा केली जाते.
समितीचे मुख्य बाजार आवारावर दि.19/09/2023 रोजी अंदाजे 17000/- क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास रु. 200 ते 1452 पर्यंत व सरासरी रु.700/- बाजारभाव मिळाले. त्याचप्रमाणे टोमॅटोची देखील 157 क्रेटसची आवक झाली असुन टोमॅटोला जास्तीत जास्त 665/- प्रती क्रेटसप्रमाणे व सरासरी रु. 500/- प्रती क्रेटस् प्रमाणे बाजारभाव मिळाले. समितीचे मुख्य बाजार आवारावर दिवसेंदिवस भाजीपाला आवकेत वाढ होत आहे.
त्यामुळे समितीचे सभापती श्री. संजय जाधव यांनी प्रत्यक्ष लिलावाचे ठिकाणी भेट देऊन लिलावाच्या कामाकाजाची पाहणी केली व शेतक-यांच्या व व्यापारी वर्गाच्या अडी-अडचणींची माहिती घेतली. तसेच शेतकरी बांधवांना मालविक्रीनंतर तात्काळ स्वरुपात माल विक्रीचे पेमेंट घ्यावे. 24 तासाच्या आत पेमेंट न मिळाल्यास बाजार समितीकडे तक्रार करावी. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनी माल विक्रीस आणतांना प्रतवारी करुन मोठ्याप्रमाणात चांदवड बाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन केले.
यावेळी व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

