[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र देवरे यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी मार्केट कमिटीच्या सभागृहात त्यांचा सत्कार केला.

दरेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र देवरे यांची बिनविरोध निवड

दरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. दरेगाव, ता. चांदवड, जि. नाशिक या संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडणूकी कामी श्री. भाऊसाहेब अहिरे, सहकार अधिकारी (प्र.श्रे.) अधीन, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड यांच्या उपस्थितीत तालुका देखरेख सहकारी संघ मर्या चांदवड (मार्केट परिसर), ता. चांदवड, जि. नाशिक यांचे कार्यालयात चेअरमन पदाच्या निवडी बाबतची सभा घेण्यात आली- सदर सभेस विद्यमान संचालक रविंद्र गांगुर्डे , संजय गांगुर्डे , भाऊसाहेब देवरे ,दिनेश पगार ,माधव देवरे ,राजेंद्र देवरे,विक्रम गांगुर्डे,भाऊसाहेब जाधव, रतन गांगुर्डे
मधुकर परदेशी ,एकनाथ अहिरे हे उपस्थित होते. तर दोन संचालक अनूपस्थित होते.

चेअरमन पदासाठी नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले चेअरमन पदासाठी श्री. राजेंद्र गमन देवरे यांनी आपले नामनिर्देशनपत्र घेवून आध्यासी अधिकारी यांचेकडे सादर केले
प्राप्त नामनिर्देशनपत्राची छाननी केली असता चेअरमन पदासाठीचे नामनिर्देशन पत्रावर उमेदवार म्हणून श्री. राजेंद्र गमन देवरे, सुचक म्हणून श्री.संजय बाबाजी गांगुर्डे व अनुमोदक म्हणून श्री. दिनेश निवृत्ती पगार यांनी स्वाक्षरी केलेली आहे. दरेगाव संस्थेच्या चेअरमनपदी श्री. राजेंद्र गमन देवरे यांची अविरोध निवड करण्यात आणि व तसे सभेपुढे घोषित करण्यात आले.


यावेळी माजी सरपंच नथू देवरे, माजी चेअरमन विक्रम देवरे, बबनराव गांगुर्डे , दगु पाटील देवरे, कौतिक जाधव, माजी उपसरपंच एन.डी.देवरे , उत्तम गांगुर्डे , सूर्यकांत गरुड, रमेश देवरे, विठोबा देवरे, दत्तू पगार संपत देवरे, दामू देवरे, धर्मा गांगुर्डे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन यांचा सत्कार ग्रामस्थांनी केला. तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी मार्केट कमिटीच्या सभागृहात त्यांचा सत्कार केला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या