[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला पंतप्रधान किसान समृद्धीचे समर्पण

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवडला पंतप्रधान किसान समृद्धीचे समर्पण

गुरुवार दि 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी देशातील शेतकऱ्यांसाठी, प्रधानमंत्री किसान समद्धी केंद्र (पीएम के एस के )- 1,25,000 केंद्र देशातील शेतकऱ्यांना समर्पित केले, पीएम किसान निधी च्या पुढील हप्त्याचे वितरण केले तसेच सल्फर लेपित युरिया चे लॉंचिंग केलेगेले व देशातील शेतकऱ्यांना समर्पित केले.

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र एक लाख 25 हजार केंद्र देशातील समर्पित करणारा कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील आमदार डॉ राहुल आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री संजय दगुजी जाधव, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, कोरोमंडल कंपनीचे झोनल मॅनेजर समाधान बुधवंत, श्रीमती सोनल लाड बी.डी. ओ. चांदवड, श्री विलास सोनवणे तालुका कृषी अधिकारी, श्री विजय चौधरी गुणवत्ता निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती चांदवड, कोरोमंडलचे नाशिक विभागीय व्यवस्थापक अमित खांदे, तसेच प्रतिनिधी किरण ठाकरे चांदवड, चेतन पवार कळवण, चेतन महाजन मालेगाव तसेच तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

यावेळी डॉ राहुल आहेर यांनी शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याचे आवाहन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा चांदवड तालुका अग्रो डीलर्सचे अध्यक्ष संजय जाधव यांनी युरियाचा तुटवडा व लिंकिंग या विषयावर लोकप्रतिनिधींकडे भाष्य केले व व्यापाऱ्यांच्या अडचणी समस्या सांगितल्या. कोरमंडलचे समाधान बुधवंत यांनी कंपनीच्या खतांचा पुरवठा वेळेवर होईल याचे आश्वासन दिले. तालुका कृषी अधिकरि विलास सोनवणे यांनी उपस्थित शेतकरी बंधूना मार्गदर्शन केले व योजनांची माहिती सांगून आभार प्रदर्शन केले.

देशभर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मधून जिल्ह्यात सर्वाधिक उपस्थिती चांदवड येथे असल्याने सर्वत्र कोरोमंडल कंपनीच्या नियोजनाचे व तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदवड यांचे कौतुक होत आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या