[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आडगाव रेपाळ वि. का. संस्थेच्या अध्यक्षपदी शरदराव शिंदे तर उपाध्यक्षपदी सौ.शैलाताई नारायण गुंजाळ बिनविरोध

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

आडगाव रेपाळ वि. का. संस्थेच्या अध्यक्षपदी शरदराव शिंदे तर उपाध्यक्षपदी सौ.शैलाताई नारायण गुंजाळ बिनविरोध

आडगाव रेपाळ (वार्ताहर ):– आडगाव रेपाळ वि. का. संस्थेच्या अध्यक्षपदी शरद शिंदे व उपाध्यक्षपदी सौ.शैलाताई नारायण गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 आडगाव रेपाळ वि.का.संस्थेचे सन 2022 ते2027 या कालावधीसाठी संचालक मंडळ निवडणून आले असल्याने आवर्तन पद्धतीने ठरल्याप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निंबधक,सहकारी संस्था, येवला श्री सुरेश बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी संचालकांची बैठक होऊन अध्यक्षपदी शरद भास्कर शिंदे यांची व उपाध्यक्षपदी सौ.शैलाताई नारायण गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी निव्रुती गायके यांनी सुचना केली त्यास अशोक माने यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी दत्तु मुरकुटे यांनी सुचना आणली तर रावसाहेब महाले यांनी अनुमोदन दिले.

संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित केले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी सभेस माजी अध्यक्ष अशोक माने , ज्ञानेश्वर तनपुरे ,संचालक राघू जगताप, रावसाहेब महाले,हरिभाऊ शिंदे ,निवृत्ती गायके, दतु मुरकुटे,किसन शिंदे, बबन कवडे ,साहेबराव पगारे , रमेश निकम,सुरेश बढे, सुनिता पानसरे ,सचिव लहानु धांद्रे ,मा.सरपंच नारायण गुंजाळ, चांगदेव तनपुरे, भाउसाहेब तनपुरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या