शिक्षण विभाग पं. स. चांदवड कडून श्री रावसाहेब जाधव यांचे अभिनंदन

(सोग्रस, ता.चांदवड)
येथील श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब खंडेराव जाधव यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक सन्मान पुरस्कार प्राप्त झाला. त्यासंदर्भात त्यांचे शिक्षण विभाग पंचायत समिती चांदवडच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून माननीय शिक्षण विस्ताराधिकारी श्री. वसंतराव खैरनार साहेब हे सोग्रस येथील जाधव सरांच्या शाळेत उपस्थित राहिले. समवेत आदर्श नूतन माध्यमिक विद्यालय मंगरूळचे मुख्याध्यापक श्री सूर्यभान भांबर, श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेम्बे येथील मुख्याध्यापक श्री प्रवीण पाटील आणि वडबारे येथील जाधव सर उपस्थित होते.

श्री भांबर सर, श्री पाटील सर यांनी रावसाहेब जाधव सरांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. कु. श्रेया संजय नवले या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून जाधव यांच्या कार्याचा उल्लेख करत या शिक्षकांच्या सहवासात शिक्षण मिळत असल्याबाबत अभिमान व्यक्त केला.
शिक्षण वि. अ. श्री. खैरनार साहेब यांनी रावसाहेब जाधव सरांचे अभिनंदन करून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले व अशा शिक्षकांचा सहवास मिळणे हे विद्यार्थ्यांचेही व पालकांचेही भाग्य असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री भगवंत बोरगुडे, श्री कडू थोरमिसे, श्री सुभाष गांगुर्डे, श्री माणिक गांगुर्डे, श्री कौतिक शिंदे, श्री विजय देवरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.

