[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

उसवाड येथे विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबीयास शिवसेना शिंदे गटाची तात्काळ एक लाख रुपयांची मदत.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

राख सावरण्याचा कार्यक्रम स्मशानभूमीत चालू असताना तिथे जाऊन सांत्वन पर भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले

उसवाड येथे विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबीयास शिवसेना शिंदे गटाची तात्काळ एक लाख रुपयांची मदत.

चांदवड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विठ्ठलराव जाधव यांनी सुरू केलेली शेतकरी संवाद यात्रा चांदवड तालुक्यात मुक्कामी आली असताना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ श्री जाधव साहेबांशी संपर्क साधून चांदवड तालुक्यातील उसवाड येथे विज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या शेतकरी शेतमजूर कै. सौ मीना बटाव उसवाड यांच्या कुटुंबीयास भेटण्याचे सुचना केली त्या अनुषंगाने माननीय जाधव साहेबांनी तात्काळ बटाव कुटुंबियाची उसवाड येथे राख सावरण्याचा कार्यक्रम स्मशानभूमीत चालू असताना तिथे जाऊन सांत्वन पर भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि कुटुंबीयास तात्काळ एक लाख रुपयांची मदत केली तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले..


त्याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विकास भुजाडे ,संदीप उगले ,फौजी नाना घुले, दत्ता गांगुर्डे दीपक शिरसाठ, निलेश ढगे,, दीपक भोईटे ,बापू आहिरराव ,विठ्ठल गांगुर्डे, जनार्दन पवार मनोज सुर्यवंशी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या