[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सेल्फी पाठवा पैठणी जिंका उस्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

सेल्फी पाठवा पैठणी जिंका उस्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम संपन्न

चांदवड : चांदवड येथील ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन च्या अध्यक्ष रिंकू भूषण कासलीवाल यांच्या माध्यमातून दर वर्षाप्रमाणे नवरात्र फोटो उत्सव 2023 याही वर्षी साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावना कार्यक्रमाच्या अध्यक्षा रिंकू भूषण कासलीवाल यांनी सादर केले. दरवर्षाप्रमाणे नऊ रंगाच्या नऊ पैठण यांचा कार्यक्रम आज चांदवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे संपन्न करण्यात आला. यावेळी ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष रिंकू भूषण कासलीवाल तसेच चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा अर्चना कासलीवाल यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अनेक महिलांनी आपली उपस्थिती लावली मनाचा मोठेपणा करत सेल्फी पाठवा पैठणी जिंका या कार्यक्रमाच्या पैठणी नवदुर्गा यांच्या माध्यमातून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस महिला मनिषा शिंदे, प्राध्यापिका डॉ. डोशी, विधीतज्ञ अभिलाषा दायमा ,आशा कर्मचारी सिमा बागुल, सुनिता शात्रिय ह.भ.प. सिमाताई काळे,महाराज या महिला यांना मोठेपणा देत यांच्या हस्ते पैठणी वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी नारंगी रंगाची पैठणी राखी घोडके पांढरा रंगाची पैठणी कल्याणी कुलकर्णी लाल रंगाची पैठणी योगिता वैद्य, निळारंगाची पैठणी योगिता सोनवणे, पिवळारंगाची पैठणी सुवर्णा शिंदे, हिरवा रंगाची पैठणी रश्मी अजमेरा राखाडी रंगाची पैठणी तेजश्री अजमेरा, जांभळा रंगाची पैठणी संध्या सोनवणे मोर हिरवा रंगाची पैठणी स्नेहल कांकरिया अशा नऊ रंगाच्या पैठण्या या महिलांना वाटप करण्यात आल्या. यावेळी अर्चना कासलीवाल, डॉ.डोषी, ह.भ.प.सीमाताई काळे, विधीतज्ञ अभिलाषा दायमा, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता तेली यांनी केले अर्चना कासलीवाल यांनी आलेल्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या