[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड-देवळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड-देवळा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समावेश करावा चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

चांदवड –
चांदवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातील चांदवड व देवळा या मतदार मतदारसंघातील शेतकरी व कष्टकरी जनतेच्या हिताच्या दृष्टीने यंदा पावसाचे प्रमाण सदर तालुक्यात अत्यंत कमी स्वरूपाचे असल्याने पावसाळी हंगामी पूर्ण कोरडा गेला. तसेच दुबार पेरणी होऊनही काही हाती आले नाही. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेला दिवाळी सण साजरा करणे ही शक्य त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. ही बाब दोन्ही तालुक्यांच्या दृष्टीने जनतेवर अन्याय करण्यासारखी असून याचा चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
यंदा चांदवड-देवळा दोन्हीही तालुक्यांमध्ये अत्यंत कमी स्वरूपात पाऊस झाल्यामुळे तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. शेतातील पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेती उत्पादन घट, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा पाणी, रोजगार, या समस्या दिवसेंदिवस रुद्र रूप धारण करीत आहेत. आज तालुक्यातील काही गावांमध्ये तर आजचे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे ही सर्व गंभीर परिस्थिती पाहता दोन्ही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने याची गांभीर्याने विचार करावा. खाली दिलेल्या मुद्द्यांचा विचार करून अमलात आणावे


१) खरीप हंगामात कमीत कमी पावसा अभावी बहुतांशी सोयाबीन, मका कांदे, इत्यादी पिके संपूर्ण नष्ट झालेली आहे. त्यामुळे पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना आज पाहतो पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे पिक विम्याची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी.
२) पिण्याचे पाणी व व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून जनावरांच्या चारा व टंचाईग्रस्त गावे व वाढीवस्त्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच जनावरा करता शासनाच्या स्तरावरून छावण्या सुरू करण्यात याव्या.
३) आपल्या टंचाईग्रस्त तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी गावचे सरपंच वि .वि. का सेवा सोसायटीचे प्रतिनिधी तालुक्यातील सर्व विविध संस्थांच्या पदाधिकारी व सरकारी अधिकारी यांच्याशी संयुक्त स्वरूपात आपल्या स्तरावर तातडीने बैठक घेण्यात यावी
अन्यथा चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी
निवेदनावर डॉ.सयाजीराव गायकवाड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांदवड तालुका, विजय जाधव दतात्रय वाघचौरे सुखदेव जाधव शैलेश ठाकरे अनिल पाटील देवमन पवार बाबुराव पवार धमाजी शिंदे माधव पवार सुरेश शिरसाट नवनाथ आहेर सुखदेव खैरनार प्रकाश शेळके शाहू शिंदे सागर साठे गोरख शिंदे हरि कासव शंकर थोरात अरुण काका न्याहरकर , म्हसु गागरे, वसंत पगार तुकाराम पगार तुकाराम सोनवणे सतीश जाधव योगेश ठाकरे सागर साठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या