राहुल येवला यांची शासनाच्या राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेच्या तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती
चांदवड:- येथील नॅक मानांकित ‘ए प्लस’ दर्जाच्या एसएनजेबी संस्थेच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयाचे योगप्रशिक्षक तसेच योग विद्या धाम, चांदवडचे केंद्रप्रमुख, राज्यस्तरीय योगासन स्पर्धा परीक्षक राहुल (अंबादास) भिलाजी येवला यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धा पंच व तांत्रिक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व जिल्हा क्रीडा परिषद,अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धांचे आयोजन दिनांक ५ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुर्कीदपुर, नेवासा फाटा, नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या कालावधी करिता राहुल येवला यांची नियुक्त करण्यात आलेली आहे.
या नियुक्तिबद्दल राहुल (अंबादास) येवला यांचे एसएनजेबी संस्थेच्या अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथी व आयुर्वेदिक हॉस्पिटल मार्फत तसेच महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन, योग विद्या धाम, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन त्याचप्रमाणे विविध योग संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

