सोग्रस माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
सोग्रस – येथील श्री अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयात शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनेक वैज्ञानिक प्रतिकृती व रांगोळ्यांचे सादरीकरण करण्यात आले.
शेती, मानवी शरीराचे अवयव, चांद्रयान3, पर्यावरण, रस्ते वाहतूक, पाणी, इत्यादी विषय विद्यार्थ्यांनी हाताळल्याचे दिसून आले.
प्रदर्शनाचे उदघाटन माध्यमिक विद्यालय मंगरूळचे शिक्षक श्री बाळकृष्ण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर समारोप प्रभारी केंद्रप्रमुख श्री संतोष चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रस्ताविकातून मुख्याध्यापक श्री रावसाहेब जाधव यांनी कार्यक्रचा उद्देश स्पष्ट केला तर सूत्रसंचालन श्री थोरमिसे के एम यांनी केले.
प्रदर्शनास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोग्रसच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भेट देऊन प्रतिकृती बनवणाऱ्या बाल वैज्ञानिकांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेतला.
श्री बोरगुडे बी आर, गांगुर्डे एस के, गांगुर्डे एम टी, शिंदे के बी, देवरे व्ही एच यांनी नियोजनात सहभाग घेतला. तर प्रदर्शन आयोजनासाठी संस्था सचिव मा. प्रशांतदादा बनकर, अध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, सर्व संस्था संचालक, शिक्षणविस्तार अधिकारी मा बोडके साहेब, मा वसंतराव खैरनार साहेब, गटशिक्षणाधिकारी मा शिंदे साहेब, मा. विशाल पवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

