शिंगवे येथील पोलीस दूरक्षेत्र सुरू.
पोलीस दूरक्षेत्र शिंगवे येथे ग्रामपंचायत सरपंच श्री.आत्माराम खताळ तसेच मेसनखेडे सरपंच श्री.संतोष माळी यांनी काही दिवसापूर्वी माननीय आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून बंद असलेले पोलीस दूरक्षेत्र शिंगवे चालू करून तेथे पोलीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावे.अशी मागणी केली होती.आमदार साहेबांनी तात्काळ दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. व त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपलब्ध करून दिले. याप्रसंगी पो.नि.कैलास वाघ साहेब यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.शिंगवे सरपंच श्री.आत्माराम खताळ,मेसनखेडे सरपंच श्री.संतोष माळी,शिंगवे दूरक्षेत्र बीट अमलदार पो.ह.पवार दादा,सांगळे दादा तसेच पो.कॉ. बुरुंगले दादा मेसनखेडे पोलीस पाटील श्री.अनिल ठोंबरे,श्री.श्रावण खताळ, आनंद पगारे,रमण डावरे,दिलीप सुरासे,लक्ष्मण सोनवणे,नवनाथ शिंदे,संजय सुरासे,यशवंत खताळ,गुलाब शेख आदी उपस्थित होते.

