चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साळ ता. चांदवड जिल्हा नाशिक या विद्यालयांमध्ये भरविण्यात आले होते सदर प्रदर्शनामध्ये माध्यमिक विद्यालय शिंगवे तालुका चांदवड या विद्यालयाने सहभाग नोंदवला असून “शैक्षणिक साहित्य” या उपक्रमामध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक विद्यालयास प्राप्त झाल्याने
विज्ञान शिक्षक जे.एस.स वाले सर व श्री पाटील व्हीं.के.सर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चांदवड पंचायत समितीचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री शिंदे साहेब तसेच मा.गटविकास अधिकारी श्रीमती लाड मॅडम व विस्तार अधिकारी श्री रामचंद्र बोडखे साहेब,श्री वसंतराव खैरनार साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच माध्यमिक विद्यालय शिंगवे विद्यालयांमध्ये शनिवार दिनांक 23/ 12 /2023रोजी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री गांगुर्डे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विद्यालयात शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थी कु.प्रतिक योगेश मढे कु. राज संजय गुंड कुं.हर्षद सिताराम मढे यांचे विद्यालयाचे वतीने अभिनंदन करण्यात आले व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

