[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

वडनेर भैरव येथे सलादे बाबा दत्त मंदिर येथे दत्त जन्म उत्सव सोहळ्यास सुरवात

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

वडनेर भैरव येथे सलादे बाबा दत्त मंदिर येथे दत्त जन्म उत्सव सोहळ्यास सुरवात

वडनेर भैरव ता.चांदवड येथे सलादे बाबा कला क्रीडा मंडळ व वडनेर भैरव परिसर सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने दत्त जयंती निमित्त सामाजिक व देशभक्ती उपक्रम म्हणून एक पणती तिच्या साठी एक दिवा सैनिक यांच्या साठी हा उपक्रम सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी सलादे बाबा दत्त मंदिर वडनेर भैरव येथे राबविण्यात येणार आहे.अशी माहिती आयोजक यांनी दिली.
वडनेर भैरव येथे नाथकृपा सदन आणि गत बारा वर्षांपासून सलादे बाबा दत्त मंदिर येथे सार्वजनिक दत्त जयंती उत्सव वडनेर करांच्या वतीने राबविण्यात येत असतो. हे दत्त जयंतीचे 62वे वर्ष आहे.
दत्त जन्म उत्सवाची सूरवात दत्त नाथ भक्त श्री.दत्ताजी परश राम शिंदे व सौ.सुशीला दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते घटस्थपणा करून झाली.
दररोज महिलांचे गुरुचरित्र पारायण वाचन,गुरू जप,आरती आणि सायंकाळी संभाजी नगर येथील ह.भ. प. विठ्ठल महाराज राठोड यांची संगीत दत्त कथा होत आहे
आज सोमवार दिनांक 25/12/2023रोजी एक पणती तिच्या साठी म्हणजेच कन्येसाठी आणि एक दिवा सैनिक यांच्या साठी असा देशभक्ती पर उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी मंदिर परिसरात पणती आणि दिवे लावून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे .
या कार्यक्रमास भाजापाचे नाशिक लोकसभा मतदार संघ चे प्रमुख श्री. केदा नाना आहेर हे उपस्थितीत राहणार आहे.
याचवेळी सेवेत असणाऱ्या सैनिक यांचा सत्कार केला जाणार आहे.
यावेळी श्री.यावेळी अध्यक्षस्थानी श्री.एन. डी.दादा माळी हे असतील.तर सलादे बाबा कला क्रीडा मंडळ चे अध्यक्ष मनोहर नाना पाटोळे,उपाध्यक्ष रामचंद्र आप्पा मोरे,सचिव राहुल पाचोरकर दीपक पाचोरकर ,दत्तात्रय निखाडे,महेंद्रसिंग परदेशी,सुरेश तात्या उशीर,उत्तम भोसले, अनिल पवार,कायदेशीर सल्लागार पोपटराव पवार,हे असणार आहे.

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या