[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

फुले जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती झाल्टे मॅडम यांनी भूषविले याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी जयंतीच्या निमित्ताने सखोल अशी माहिती सादर केली काही विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी सखोल अशी माहिती दिली याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने श्री माळी टी के, श्री जे.एस.वाले तसेच मुख्याध्यापक श्री गांगुर्डे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती झाल्टे मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर अनेक प्रसंग सांगितले व अमोल असे मार्गदर्शन केले कु.अक्षता दत्तू गुंड हिने सर्वांचे आभार मानले.मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
श्री एकनाथराव संभाजी शिंदे
यांचे शालेय समस्या, शालेय स्तरावरील योजना व शालेय परिसर स्वच्छता या संदर्भातील राज्य स्तरावरील पत्र, त्याचं सामुदायिक वाचन ,”माध्यमिक विद्यालय शिंगवे” तालुका चांदवड या ठिकाणी काल दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी वाचन करण्यात आले. सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते सामुदायिक वाचनामध्ये सर्वांचा सहभाग होता.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या