महायुती बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्धार
चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक चांदवड येथील गणुर चौफुली वरील शासकिय विश्राम गृहात संपन्न झाली . या बैठकीत तालुक्यातील विविध समस्यावर चर्चा करण्यात आली व या समस्या सरकार दरबारी मांडुन सोडविण्यासाठी कसा प्रयत्न करण्यात येईल यावर चर्चा करण्यात आली

आगामी काळामध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व घटकांना सोबत घेऊन तळागाळामध्ये पक्षाचे संघटन वाढविण्याचे काम करुन तालुक्यातील सर्वच घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्यात येणार व पक्षाची मजबूत फळी निर्माण करण्याचे काम आगामी काळात करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणेच आपली काम करण्याची चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका असेल , आपला पक्ष हा महायुतीचा प्रमुख घटक असल्याने महायुती बळकट करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा आहेर यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना यावेळी बैठकीत केले.
या बैठकीत पक्ष संघटन वाढवणे पक्षाच्या कार्यकारणी बाबत चर्चा करण्यात आली. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे तालुक्यातील विविध समस्यांचा यावेळी आढावा घेण्यात आला व हे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे , प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार करून संघटन मजबूत करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष रघुनाथ आण्णा आहेर, चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अनिलजी काळे, जेष्ठ नेते आर.डी.थोरात, सुनिल तात्या कबाडे, बाळासाहेब मावळे, बाकेराव जाधव, चांदवड शहराध्यक्ष गोकुळ देवरे, नितीन गांगुर्डे, शांताराम गांगुर्डे, शिवाजी निकम,ज्ञानेश्वर पगार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या बैठकीत उपस्थित असणाऱ्यांमध्ये प्रकाश जाधव, शिवाजी निकम, ज्ञानेश्वर सोनवणे,दिपक पवार, बाजीराव खैरे,निलेश खैरे,अशोक गांगुर्डे, आण्णा आहेर, शांताराम शेलार भारत आहेर, रामदास नरोटे, भाऊसाहेब जाधव, पुंडलिक नरोटे,नंदु आहेर, मारुती गांगुर्डे, गोकुळ गांगुर्डे, यशवंत नरोटे, रंजीत ठाकरे,राहुल गांगुर्डे, ऋषिकेश बोराडे, ऋषिकेश पेंढारी आदी.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार चांदवड शहराध्यक्ष गोकुळ दादा देवरे यांनी मानले अशोक गांगुर्डे, वैभव आहेर, ज्ञानेश्वर सोनवणे त्रंबक गांगुर्डे, शंकरराव निखारे, मधुकर शेळके, संदीप पवार, बाजीराव खैरे, दशरथ ठाकरे, रामदास आहेर, ईश्वर देवरे, दत्तु सवंद्रे, मंगेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चांदवड तालुका अध्यक्षपदी रघुनाथ अण्णा आहेर व चांदवड – देवळा विधानसभा अध्यक्षपदी अनिल काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

