[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत चांदवड येथे नमो चषक – 2024 स्पर्धेस सुरवात

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या उपस्थितीत चांदवड येथे नमो चषक – 2024 स्पर्धेस सुरवात

देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र जी मोदी यांनी दिनांक १२ जाने २०२४ रोजी नाशिक येथे युवा महोत्सवाचे उद्घाटन केले त्या अनुषंगाने चांदवड-देवळा मतदार संघातील युवा खेळाडूं तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलेला वाव मिळावा यासाठी नमो चषक -2024 अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेचे उदघाटन आज चांदवड येथे मॅरेथॉन स्पर्धेने तर मंगरूळ येथे क्रिकेट स्पर्धेने आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या (५ की.मी)
मुलांच्या गटात
प्रथम सौरभ बाळू देवढे
द्वितीय नितीन देवचंद शिंदे
तृतीय जनार्दन उत्तम जाधव
मुलींच्या गटात
प्रथम वैष्णवी संदीप आहेर
द्वितीय सपना माधव आवारे
तृतीय अपेक्षा संदीप आहेर

या स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेत क्रमांक पटकाविला..

यावेळी डॉ.आत्माराम कुंभार्डे, श्री.भूषण कासलीवाल श्री.मनोज शिंदे, डॉ. नितिन गांगुर्डे, गटविकास अधिकारी श्री.मच्छीन्द्र साबळे, गटशिक्षण अधिकारी श्री.शिंदे साहेब, पोलीस निरीक्षक श्री.कैलास वाघ, प्राचार्य श्री.दत्ता शिंपी सर, श्री. विजय धाकराव, श्री. योगेश ढोमसे, श्री. शांताराम भवर, श्री. मोहन शर्मा, श्री. बाळासाहेब वाघ, श्री.निवृत्ती शिंदे, श्रीमती. गीताताई झाल्टे, सौ.कल्याणी कुलकर्णी, डॉ. भावराव देवरे श्री. वाल्मिक पवार, श्री. गणेश महाले, श्री.निलेश ढगे, श्री.संदीप उगले, श्री. राहुल हांडगे, श्री. युवराज आहेर, श्री. बाजीराव वानखेडे, श्री. दिशांत देवरे, श्री.दत्तात्रेय ठाकरे सर, श्री.आर.एस.पाटील सर, श्री.ज्ञानेश्वर काळे सर, श्री.जीवन शिंदे सर, श्री.बाळकृष्ण जाधव सर आदिन्सह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, स्पर्धक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या