[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जि. प. प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे पालक मेळावा संपन्न. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून दिगंबर दरेकर व उपाध्यक्ष म्हणून सागर जाधव यांची निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

जि. प. प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे पालक मेळावा संपन्न. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून दिगंबर दरेकर व उपाध्यक्ष म्हणून सागर जाधव यांची निवड

चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा माननीय शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सोमनाथ वाळूबा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .सरस्वती मातेच्या पूजनाने पालक मेळाव्याची सुरुवात करण्यात आली .पालक मेळाव्यात सन 2024 ते2026 या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून दिगंबर नारायण दरेकर व उपाध्यक्ष म्हणून सागर लक्ष्मण जाधव यांची निवड करण्यात आली तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून राजाराम गोधडे ,दत्तात्रय दरेकर, शांताराम गायकवाड, वृषाली जाधव, दीपक दरेकर, प्रियंका जाधव, वृषाली शिंदे, शितल दरेकर, भाऊसाहेब जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी पंकज गायकवाड ,व श्रावणी शिंदे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली तसेच कार्यक्रमासाठी विविध कार्यकारी सोसायटी निमगव्हाण /न्हनावे चे अध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश दरेकर ,ग्रामपंचायत सदस्य देवराम शिंदे,संदीप शिंदे कैलास पवार उपस्थित होते तसेच पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य, मोबाईलचा मर्यादित वापर वाचन संस्कृती व मुख्यमंत्री सुंदर शाळा स्वच्छ शाळा या विषयावर चर्चा करण्यात आली ,पालक मेळाव्यासाठी भाऊराव जाधव ,केशव चौगुले, देविदास शिंदे, बाळू इंगळे ,बापू दरेकर ,सोमनाथ जाधव, दत्तू पवार, एकनाथ शिंदे, दीपक दरेकर ,प्रभाकर दरेकर, वृषाली गोधडे ,मनीषा गोधडे, सरला पवार ,सागर शिंदे बाळू गांगुर्डे ,,भाऊसाहेब जाधव, गोरख दरेकर, संतोष गोधडे , प्रशांत गायकवाड, वृषाली शिंदे, उपस्थित होते कार्यक्रम नियोजन व सूत्रसंचालन मुख्याध्यापक शांताराम हांडगे यांनी केले व आभार वृषाली जगन्नाथ जाधव यांनी मानले

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या